Gautami Patil
Gautami Patil Team Lokshahi

सबसे कातील गौतमी पाटील आता पंजाबीमध्ये; नव्या गाण्याचा टीझर रिलीज

लावणी डान्सर गौतमी पाटीलने अख्ख्या महाराष्ट्राच्या तरुणाईला वेड लावले आहे. गौतमी पाटील अनेकदा वादामुळेच जास्त चर्चेत असते.

लावणी डान्सर गौतमी पाटीलने अख्ख्या महाराष्ट्राच्या तरुणाईला वेड लावले आहे. गौतमी पाटील अनेकदा वादामुळेच जास्त चर्चेत असते. आताही गौतमी सोशल मीडियावर ट्रेंडींगवर आली आहे. परंतु, याचे कारण वाद नाही तर तिचा लवकरच नवा अल्बम चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचा प्रोमोही रिलीज करण्यात आला आहे.

Gautami Patil
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज

गौतमी पाटील ‘तेरा पता’ या पंजाबी गाण्यात झळकली आहे. नुकतेच गौतमी पाटीलने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या गाण्याची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. तिच्या गाण्याला चाहत्यांनी कमेंटसचा पाऊस पाडला असून गौतमीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मराठीत लोकप्रियता मिळवल्यानंतर पंजाबी गाण्यांमध्ये देखील गौतमी आपले नशीब आजमावणार आहे.

दरम्यान, गौतमी पाटीलची लवकरच सिनेसृष्टीतही एन्ट्री करणार आहे. 'घुंगरू' असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटामध्ये गौतमीच्या नृत्यासह तिचा अभिनय देखील पाहता येणार आहे. तसेच या चित्रपटाचे अर्धे शुट भारतातील सोलापूर, माढा आणि हंपी येथे करण्यात आले. तर चित्रपटाचे अर्धे शुट थायलंडमध्ये होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com