Ladki Bahin Yojana: नोव्हेंबर हप्ता मिळाला, पण डिसेंबर हप्त्यावर अजून प्रतीक्षा; अपडेट्स वाचा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा १,५०० रुपयांचा हप्ता कालपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे. मात्र डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न आता लाखो महिलांकडून विचारला जात आहे. मध्यंतरी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्र येणार अशी चर्चा असली तरी फक्त एकाच महिन्याचे पैसे जमा झाल्याने महिलांचा हिरमोड झाला आहे.
सरकारी सूत्रांनुसार, डिसेंबरचा हप्ता १४ जानेवारीपूर्वी किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा काही दिवसांत होण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत पैसे जमा होतील. आता जानेवारी महिना सुरू झाल्याने डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र मिळण्याची चर्चाही सुरू झाली असली तरी याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दरम्यान, नोव्हेंबरचा हप्ता अजूनही काही महिलांच्या खात्यात पोहोचला नसून, येत्या काही दिवसांत सर्व लाभार्थींना पैसे मिळतील. मात्र पुढच्या महिन्यापासून नियम कडक होत आहेत. केवायसी (नो योर कस्टमर) न केलेल्या महिलांचा लाभ बंद होईल तसेच निकषात न बसणाऱ्यांनाही योजनेतून बाहेर काढले जाईल. यामुळे लाखो महिलांना तात्काळ केवायसी करावे लागेल. लाडकी बहीण योजनेच्या या बदलांमुळे महिलांमध्ये चिंता वाढली असून, सरकारी पातळीवर स्पष्टीकरणाची मागणी होत आहे.
नोव्हेंबरचा ₹१५०० हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला
डिसेंबरचा हप्ता १४ जानेवारीपूर्वी किंवा निवडणूक आधी येणार
नियम कडक होणार; केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ थांबवला जाईल
लाभार्थींमध्ये चिंता वाढली; सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी
