Pandharpur: पंढरपूरात मोठा निर्णय! विठ्ठल मंदिर आणि परिवार देवतांच्या ३७ मूर्ती बदलणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
देशभरातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या विठ्ठल मंदिर आणि बाहेरील परिवार देवता यामध्ये भंग पावलेल्या शेकडो वर्षांपूर्वीच्या मूर्ती नवीन वर्षात बदलण्यात येणार आहेत. सध्या विठ्ठल मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू असून मंदिरामध्ये असणाऱ्या २४ परिवार देवता आणि मंदिरा बाहेर असणाऱ्या २८ परिवार देवतांपैकी भंग पावलेल्या ३७ मूर्तीं बदलण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
जतन व संवर्धन कामाची पाहणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि संबंधित आर्किटेक्चर यांनी केल्यानंतर भंग पावलेल्या मुर्त्यांचे वास्तव काही दिवसापूर्वी समोर आले होते. हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही मंदिरात भग्नमूर्ती पूजेसाठी ठेवली जात नसल्याने आता भग्न पावलेल्या या शेकडो वर्षांपूर्वीच्या मूर्ती बदलाव्या लागणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.
ज्या वेळेला या पुरातन मूर्तींवरील लेप काढण्यात आला त्यावेळी या मूर्ती भंग पावल्याचे समोर आल्याचे अवसेकर यांनी सांगितले. याबाबत मूर्ती बनवायचे काम पूर्ण झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. या नवीन मूर्ती बसवल्यानंतर पूर्वीच्या शेकडो वर्षापूर्वीच्या पुरातन भग्न मूर्ती मंदिरातच म्युझियमच्या स्वरूपात संरक्षित केल्या जाणार असल्याचेही गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

विठ्ठल मंदिर व परिसरातील ३७ भग्न मूर्ती बदलण्याचा निर्णय
पुरातत्व विभागाच्या तपासणीनंतर भग्न मूर्तींची ओळख
नवीन मूर्तींची येत्या आठ दिवसांत प्राणप्रतिष्ठा
जुन्या पुरातन मूर्ती मंदिरातील म्युझियममध्ये जतन केल्या जाणार