NAVI MUMBAI AIRPORT NAMING PROTEST IN DELHI FOR LOKNETE D.B. PATIL
Navi Mumbai Airport

Navi Mumbai Airport: 'नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व.दि.बा.पाटलांचं नाव द्या'; या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन

Maharashtra Politics: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे खासदार दिल्लीतील संसद भवनाबाहेर तीव्र आंदोलन केले.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दिल्ली संसद भवनाच्या बाहेर महाविकास आघाडीच्या खासदारांच्या वतीने निदर्शन करण्यात आले.

NAVI MUMBAI AIRPORT NAMING PROTEST IN DELHI FOR LOKNETE D.B. PATIL
Indigo Airlines: मावळातील गुलाब शेतीला इंडिगोचा फटका, देशातील शेतकऱ्यांचे 10 कोटींचे नुकसान

या निदर्शन आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासह महाविकास आघाडीचे खासदार सहभागी झाले होते. स्व.दि बा पाटील यांच्या नावाच्या घोषणा देत हातात आपल्या मागणीचे फलक घेऊन खासदारांनी हे आंदोलन केले.

NAVI MUMBAI AIRPORT NAMING PROTEST IN DELHI FOR LOKNETE D.B. PATIL
Doland Trump Company: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा धमाका! भारतात तब्बल 1 लाख कोटींची गुंतवणूक, कोणत्या प्रकल्पात होणार वापर?

मागील 11 वर्षांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी स्थानिक भूमिपुत्रांच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र केंद्र सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जोपर्यंत विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देणार नाही तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलन सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.

Summary
  • नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी ११ वर्षांपासून प्रलंबित आहे.

  • खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली संसद भवनाबाहेर आंदोलन.

  • सुप्रिया सुळे यांसह महाविकास आघाडीचे अनेक खासदार सहभागी.

  • केंद्र सरकार नामांतराच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com