शिरसाटांना क्लीनचिट मिळाल्यानंतर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, पोलिसांवर दबाव...

शिरसाटांना क्लीनचिट मिळाल्यानंतर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, पोलिसांवर दबाव...

सुषमा अंधारे प्रकरणी संजय शिरसाट यांना पोलिसांची क्लीन चिट मिळाली आहे.
Published on

मुंबई : सुषमा अंधारे प्रकरणी संजय शिरसाट यांना पोलिसांची क्लीन चिट मिळाली आहे. संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टिप्पणी केली होती. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसात तक्रार दाखल झाली होती. तक्रारीच्या चौकशीनंतर संजय शिरसाट यांना पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. यावर आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिरसाटांना क्लीनचिट मिळाल्यानंतर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, पोलिसांवर दबाव...
मविआमधील अनेक लोक आमच्या संपर्कात; शंभूराज देसाईंचा मोठा दावा, लवकरच मोठे स्फोट

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, संजय शिरसाट यांना क्लीनचिट दिल्याचा अहवाल अद्याप महिला आयोगाकडे आला नाही. याप्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, तपासही अद्याप सुरू आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने पोलिसांवर दबाव असू शकतो, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. या घटनेची निःपक्ष चौकशी व्हायला हवी. यासाठी तिसऱ्या यंत्रणेकडे याचा तपास देण्यात यावा. जेणेकरुन तक्रारदार व्यक्तीला योग्य न्याय मिळेल, अशी मागणी त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com