Ashok Chavan
ASHOK CHAVAN FACES SERIOUS ALLEGATIONS OVER BJP CANDIDATE TICKET DISTRIBUTION

Ashok Chavan: उमेदवारीसाठी अशोक चव्हाण यांनी सर्व उमेदवारांकडून ५० लाख घेतले, माजी नगरसेवक भानूसिंग रावत यांचा गंभीर आरोप

BJP Controversy: नांदेडमध्ये भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

भाजप नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी घेतल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक भानूसिंग रावत यांनी केला आहे. अनेक वर्षे खासदार अशोक चव्हाण यांच्यासोबत काम केल्यानंतरही त्यांनी आपल्या कार्याची कदर न केल्याचा दावा रावत यांनी केला. उमेदवारीसाठी ऐनवेळी टिकिट कापले गेले असून, त्याआधी ५० लाख रुपये जमा करण्यास सांगितले गेल्याचे त्यांनी सांगितले.

Ashok Chavan
KDMC: कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी

भानूसिंग रावत म्हणाले, "नांदेड शहरात केवळ १९ भाजप कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र अनेक निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा बळी घेतला आहे." येणाऱ्या काळात जनता खासदार अशोक चव्हाण यांना योग्य धडा शिकवेल, असा इशाराही रावत यांनी दिला.

Ashok Chavan
Raj Thcakeray: 'मुंबई मराठी माणसाची,आपल्याकडे शेवटची संधी', राज ठाकरेंचं उमेदवारांना आवाहन

हा वाद भाजपच्या स्थानिक उमेदवारी वितरणावरून पेटला असून, पक्षांतर्गत असंतोष वाढत असल्याचे दिसत आहे. नांदेडमधील निवडणूक मैदानात हे आरोप राजकीय रंग चढवतील, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

Ashok Chavan
Satara Sahitya Sammelan: साताऱ्यात ३२ वर्षांनी भरणार साहित्य मेळा, ९९ व्या साहित्य संमेलनाला साताऱ्यात आजपासून सुरूवात
Summary
  • माजी नगरसेवक भानूसिंग रावत यांचे अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप

  • उमेदवारीसाठी प्रत्येकी ५० लाख मागितल्याचा दावा

  • नांदेडमध्ये भाजपच्या तिकीट वाटपावरून वाद

  • पक्षांतर्गत असंतोष वाढल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com