UNESCO ADDS DIWALI TO INTANGIBLE CULTURAL HERITAGE LIST
UNESCO DIWALI

UNESCO: युनेस्कोच्या अमुर्त हेरिटेजच्या यादीत आता दिवाळी सणाचा समावेश, मंत्री आशिष शेलार यांची माहिती

Delhi Celebration: युनेस्कोने दिवाळीचा समावेश अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

युनेस्कोने नव्या दिल्लीचे मुख्य प्रतिनिधी भारताच्या प्रमुख सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उत्सव दिवाळीला त्यांच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारताच्या समृद्ध संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरेला जागतिक स्तरावर मान्यता आणि गौरव प्राप्त झाला आहे.

UNESCO ADDS DIWALI TO INTANGIBLE CULTURAL HERITAGE LIST
Indigo Airlines: मावळातील गुलाब शेतीला इंडिगोचा फटका, देशातील शेतकऱ्यांचे 10 कोटींचे नुकसान

कला, संस्कृती, भाषा आणि पर्यटन मंत्री कपिल मिश्रा यांनी याबद्दल अभिमान व्यक्त करत सांगितले की, हा निर्णय संपूर्ण भारतीय समाजासाठी अत्यंत आनंददायी आणि अभिमानाचा क्षण आहे. त्यांनी नमूद केले की या ऐतिहासिक यशामागे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सततचे प्रयत्न आणि नेतृत्व आहेत, ज्यामुळे भारताचा सांस्कृतिक वारसा जागतिक ओळखीचा भाग बनला आहे.

UNESCO ADDS DIWALI TO INTANGIBLE CULTURAL HERITAGE LIST
Doland Trump Company: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा धमाका! भारतात तब्बल 1 लाख कोटींची गुंतवणूक, कोणत्या प्रकल्पात होणार वापर?

युनेस्कोच्या या महत्वाच्या निर्णयाची औपचारिक घोषणा १० डिसेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर करण्यात येणार आहे. या निमित्ताने देशभरात दिवाळीसारखे उत्साही वातावरण साजरे केले जाईल. दिल्ली सरकारनेही या उत्सवासाठी विस्तृत आणि भव्य कार्यक्रमांच्या तयारीला सुरुवात केली आहे.

UNESCO ADDS DIWALI TO INTANGIBLE CULTURAL HERITAGE LIST
Pimpri-Chinchwad Accident: पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघात; भरधाव बसची दोन बहि‍णींना धडक, एकीचा जागीच मृत्यू

दिल्ली हाटमध्ये भव्य दिवाळी उत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून लाल किल्ल्यावर दीपप्रज्वलनाचे भव्य समारंभ होणार आहेत. तसेच, दिल्लीतील प्रमुख चौक व रस्त्यांवर रोषणाईची सजावट करण्यात येणार आहे. दिल्लीतील सर्व सरकारी इमारतींवरही दिवाळीच्या निमित्ताने विशेष रोषणाई केली जाणार आहे. मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ दिल्ली हाट येथे होणाऱ्या दिवाळी सणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

दिल्ली सरकारने सर्व नागरिकांना यामध्ये उत्साह, सौहार्द, समृद्धी आणि सांस्कृतिक एकतेने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हा निर्णय केवळ दिवाळी सणासाठीच नव्हे तर भारतीय संस्कृतीच्या विविधान वैभवाला जागतिक स्तरावर उजाळा देणारा मानला जात आहे. यामुळे भारताचा सांस्कृतिक वारसा अधिक दृढ होईल तसेच देशातील विविधतेतील एकात्मतेचा संदेश जगाला दिला जाईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com