Bhai Jagtap
Bhai JagtapTeam Lokshahi

"Ballot Paper वर निवडणुका घ्या, तरच..."; काँग्रेसनं उपस्थित केला नवा मुद्दा

काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केंद्र सरकारवर नरेंद्र मोदींवर निशाणा साधत ते केवळ EVM मुळे सत्तेत आल्याचा आरोप केला आहे. तसंच राज्यात येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका Ballot Paper वर घ्या असं आवाहन भाई जगताप यांनी केलं आहे. अशा पद्धतीनं निवडणुका घेतल्या तरच सत्य समोर येईल. अन्यथा आमचे तरी डोळे उघडतील असं भाई जगताप म्हणाले आहेत.

Bhai Jagtap
पोलीस अभ्यास करुनच गुन्हा दाखल करतात; 'राणा' प्रकरणावर गृहमंत्र्यांची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र राज्यात आमचं सरकार असल्याने आम्ही मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना पत्र लिहीलं असल्याचं भाई जगताप यांनी सांगितलं. EVM ज्या देशाने विकसीक केलं, त्यांनी ते सोडून दिलं. मग आपण एवढ्या वर्षांपासून आपण EVM वापरत आहोत. सुरुवातील आर्ध्या देशात बॅलेट आणि अर्ध्या देशात EVM वर घ्या जेणेकरून सत्य समोर येईल असं भाई जगताप म्हणाले.

Bhai Jagtap
नवाब मलिकांची कोठडीत वाढ; कोर्टात आरोपपत्र दाखल
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com