हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, २६ नेत्यांनी राजीनामा देत केला भाजपात प्रवेश!

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, २६ नेत्यांनी राजीनामा देत केला भाजपात प्रवेश!

हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाच्या चार दिवस आधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या जवळपास २६ नेत्यांनी राजीनामा दिला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाच्या चार दिवस आधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या जवळपास २६ नेत्यांनी राजीनामा दिला आहे. येत्या १२ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर पुढील महिन्यात १२ डिसेंबर रोजी मतमोजणी नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर हा सर्वात मोठा धक्का काँग्रेसला बसला आहे.

या २६ नेत्यांनी राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाच्या चार दिवस आधी राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. “भाजपाच्या ऐतिहासिक विजयासाठी आपण सगळे मिळून काम करुयात” असे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, भाजपाचे हिमाचल प्रदेश निवडणूक प्रभारी सुधान सिंग, भाजपाचे शिमल्यातील उमेदवार संजय सूद हे सर्व पक्षप्रवेशाच्यावेळी तिथे उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com