भूषण देसाईंच्या शिंदे गट प्रवेशावर आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र; अंगावर वार होतायतं

भूषण देसाईंच्या शिंदे गट प्रवेशावर आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र; अंगावर वार होतायतं

उध्दव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे सुभाष देसाई यांचा मुलगा आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

मुंबई : उध्दव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे सुभाष देसाई यांचा मुलगा आता शिवसेनेत प्रवेश केला आहेत. भूषण देसाई आज सायंकाळी बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उध्दव ठाकरेंना मोठा धक्का मानण्यात येत आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भूषण देसाईंच्या शिंदे गट प्रवेशावर आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र; अंगावर वार होतायतं
भूषण देसाई शिंदे गटात जाणार? ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, वडिलांच्या मंत्रिमंडळाचा फायदा...

वॉशिंग मशीनमध्ये ज्यांना जायचे आहेत ते जाऊ शकतात. सुभाष देसाई आज देखील शिवसेनेत आहेत. 40 गद्दार जेव्हा पाठीत खंजीर खुपसत जातात तो धक्का होता पण आम्ही उभे राहिलो. अंगावर वार होत आहेत. तरी देखील आम्ही उभे आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.

तर, शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, या बातमीमुळे कृषिमंत्री शेतकऱ्यांबद्दल बोलले ती बातमी दबली. विषय दाबण्यासाठी असे विषय सुरू आहे. असे करून जे खरे विषय आहेत ते दाबत आहेत. साईनाथ आमचा वाघ असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, सुभाष देसाई हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांच्या मुलाचा काहीही हातभार नाही. भूषण देसाई स्वतःच्या फायद्यासाठी आणि दबावाला घाबरून ते शिवसेनेत जात असतील. आठ वर्षे वडिलांच्या मंत्रिमंडळाचा फायदा घ्यायचा आणि मग पक्ष सोडायचा असे सुरू आहे, असे टीकास्त्र ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी भूषण देसाईंवर सोडले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com