एकनाथ शिंदेंचा भाजप जयचंड राठोड करणार; भास्कर जाधवांचा घणाघात

एकनाथ शिंदेंचा भाजप जयचंड राठोड करणार; भास्कर जाधवांचा घणाघात

ठाण्यातून ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्याला सुरुवात झाली असून भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.

ठाणे : उध्दव ठाकरे यांना पक्षप्रमुख बाळासाहेबांनी केले. बाळासाहेबांचा विश्वासघात तुम्ही केला. ज्या माणसांची नेमणूक बाळासाहेबांनी केली त्यांना गादीवरून खाली उतरवले. कुठे फेडल हे पाप, असे टीकास्त्र ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोडले आहे. पण, लक्षात ठेवा एकनाथ शिंदे तुमचा महमद घोरी झाल्याशिवाय राहणार नाही. भाजप तुमचा जयचंड राठोड करेल, असेही त्यांनी म्हंटले आहे. ठाण्यातून ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्याला सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते.

एकनाथ शिंदेंचा भाजप जयचंड राठोड करणार; भास्कर जाधवांचा घणाघात
भरपूर बँक बॅलन्स आहे, तो पैसा ठेवून उपभोगण्यासाठी बीएमसी नाही : फडणवीस

देशात अघटीत अशी घटना 18 तारखेला घडली. शिवसेना मूळ पक्षाचे नाव आणि चिन्ह हे गद्दारांना दिले. या देशाच्या 75 वर्षाच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदा घडली. शिवसेना म्हणजे ठाकरे. धनुष्यबाण म्हणजे ठाकरे, ठाकरे म्हणजे मातोश्री. पवार देखील बाहेर पडले. पण, मूळ पक्षाच्या चिन्हावर दावा केला नाही. ही घटना तेव्हा भाजपचे लोक जाहीर सांगत होते. शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंना मिळेल. कदाचित हा निवडणूक आयोगाचा निकाल कोणत्यातरी पक्षाच्या कार्यालयातून लिहून आला होता, असा अप्रत्यक्ष निशाणा त्यांनी भाजपवर साधला आहे.

1988 साली शिवसेनेला धनुष्यबाण मिळाला. शिवसेना प्रमुखांनी धनुष्यबाण देवघरात प्रेमाने पुजला होता. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी धनुष्याबाण पुजला. चोरांना धनुष्यबाण दिल्यावर उध्दव ठाकरे यांना काय यातना आणि वेदना झाल्या असतील. शेवटचं न्यायालय जनतेचे न्यायालय आहे. म्हणून शिवगर्जना यात्रेमार्फत एकच वेळी सर्वठिकाणी जनतेच्या दरबारमध्ये जात आहे.

चोर तो चोर वर शिरजोर. कोणत्या तोंडाने बाळासाहेब आणि दिघेंचा फोटो लावतात. केदार दिघे चांगल बोलतात म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्यांना मागे ठेवलं. दावोसला गेल्यावर बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माणूस आहे. तेव्हा बाळासाहेबांचे माणूस नव्हते का? अमित शहा माझे वडीलच आहेत. माझे वडील पळवले आणि अमित शहा पण वडील झाल, असा टोला भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

राजकारणात कशी निवडणूक जिंकायची याचे तंत्र मला माहिती आहे. राजकारणात अनेक चढ-उतार आले. जनतेने मला कायम निवडून दिले. आता जिंकेपर्यंत लढायचं आहे. निवडणुका महापालिका, आमदारकी, खासदारकीच्या होऊ द्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षच जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.चिन्ह कोणतेही मिळो आपल चिन्ह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेच. ही लढाई एकत्र येऊन लढायची आहे. काळ वाईट आहे. खचून जाऊ नका. ही लढाई विचारांसाठी लढायची व जिंकायची आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com