Girish Bapat
Girish BapatTeam Lokshahi

गिरीश बापटांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

भाजपाने पुण्याचे खासदार गिरीश बापट आजारी असतानाही प्रचारात सामील केले.

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनवली असून प्रचारासाठी कंबर कसली आहे. अशातच, भाजपाने पुण्याचे खासदार गिरीश बापट आजारी असतानाही प्रचारात सामील केले. गिरीश बापट हे व्हीलचेअरवर केसरी वाडा येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आले होते. परंतु, आता त्यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन सर्वपक्षीयांकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

Girish Bapat
'खोके सरकारकडे उधळपट्टीसाठी पैसे, पण एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी नाही'

प्रकृती अस्वस्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून दूर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट हे अखेर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी सक्रिय झाले. प्रकृती अस्वस्थ असतानाही ऑक्सिजन सिलेंडरसह बापटांनी व्यासपीठावर हजेरी लावली. नाकात ऑक्सिजनची नळी असताना गिरीश बापट यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या हातालाही ऑक्सिमीटर लावण्यात आला होता. अशातही गिरीश बापट यांनी कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी होत विजयाचा कानमंत्र दिला. परंतु, यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गिरीश बापट यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, कसबा विधानसभेच्या भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांना काल प्रचारात सहभागी करण्यात आले. त्यांना वेठीस धरून ऑक्सिजन लावून व्हिलचेअरवर बसवून केसरी वाड्यात प्रचार रॅलीत सहभागी करण्यात आले. भाजपाला पराभव दिसत असल्यामुळेच त्यांनी खासदाराला प्रचारासाठी आणले आणि त्यांची प्रकृती बिघडली, असा आरोप माजी आमदार मोहन जोशी यांनी केला आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com