टिंग्याने उद्धव ठाकरेंवर बोलणं बंद केलं नाही तर...; खैरेंचा नितेश राणेंवर निशाणा

टिंग्याने उद्धव ठाकरेंवर बोलणं बंद केलं नाही तर...; खैरेंचा नितेश राणेंवर निशाणा

नितेश राणे यांच्या टीकेचा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी समाचार घेतला आहे.

कोल्हापूर : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेवरुन समाजात दंगली घडवून सत्तेत येण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न असल्याची टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केली होती. या टीकेचा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी समाचार घेतला आहे. सध्या एक टिंग्या रोज बोलतोय. या टिंग्याने जर उद्धव ठाकरेंवर बोलणं बंद नाही केलं तर त्याला जनतेला सामोरे जावे लागेल, असा निशाणा खैरेंनी नितेश राणेंवर साधला आहे.

टिंग्याने उद्धव ठाकरेंवर बोलणं बंद केलं नाही तर...; खैरेंचा नितेश राणेंवर निशाणा
भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! राम शिंदेंचे विखे पिता-पुत्रांवर गंभीर आरोप; रोहित पवारांना दिला छुपा पाठिंबा

सध्या एक टिंग्या रोज बोलतोय त्या टिंग्याला काय माहिती की हऱ्या-नाऱ्याचे उद्योग काय होते? या टिंग्याने जर उद्धव ठाकरेंवर बोलणं बंद नाही केलं तर त्याला जनतेला सामोरे जावे लागेल, अशी टीका चंद्रकांत खैरेंनी नितेश राणेंवर केली आहे. तर, आमच्या काळात एकही जातीय दंगल होऊ दिली नाही. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार येताच मोठ्या प्रमाणात दंगली घडत आहेत. राज्यात होणाऱ्या दंगली म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं फेल्युअर आहे. पुढील येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात दंगली घडवायचं काम भारतीय जनता पार्टीच करत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

छत्रपती संभाजीनगर मधील मुस्लिम जनता ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. हे लक्षात आल्यानंतर इम्तियाज जलील यांची महाविकास आघाडीत येण्यासाठी धडपड सुरू आहे, असा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. चुकून खासदार झालेल्या इम्तियाज जलील यांना आम्ही कधीही महाविकास आघाडीत घेणार नाही आणि त्यांनी येण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी प्रखर विरोध करेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आज मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांचे मुंबई एअरपोर्टवर जंगी स्वागत करण्यात आले आहे. कोश्यारींनी राजभवनावर जाऊन राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेटही घेतली. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे स्वागत करण्याचं कारण काय होतं? शिवप्रेमींच्या भावना दुखवायचं काम भाजप करत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com