अजित पवार-शरद पवारांच्या भेटीवर केसरकरांची प्रतिक्रिया; मनोमिलन...
मुंबई : राष्ट्रवादी फुट पडल्यानंतर अजित पवार यांच्यांसह सर्व आमदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली. वाय.बी. सेंटरमध्ये आमदारांनी शरद पवारांसोबत दीड तास चर्चा झाली. यामुळे मनोमिलन होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार जेष्ठ नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आमदार गेले असतील. मनोमिलन व्हावं ही आमची इच्छा आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हंटले आहे. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार हे चांगले मित्र असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी एकत्र यावे ही इच्छा, असेही केसरकरांनी बोलून दाखविले आहे. केसरकरांच्या विधानाने आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान, अजित पवार गटाच्या आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली. अजित पवारांसह सर्व आमदार शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी वाय. बी. चव्हाण सेंटरला आले होते. काल रविवार असल्यामुळे आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यामुळे बरेच आमदार आज हजर आहेत. यामुळे आमदारांना शरद पवारांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही येथे आलो आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे.