एमआयएमच्या रॅलीत औरंगजेबाच्या घोषणाबाजीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; घोषणा देणाऱ्या औरंग्याच्या औलादी कोण?

एमआयएमच्या रॅलीत औरंगजेबाच्या घोषणाबाजीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; घोषणा देणाऱ्या औरंग्याच्या औलादी कोण?

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभेदरम्यान औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर आता राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झालीये.

नागपूर : एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभेदरम्यान औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर आता राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झालीये. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घोषणा देणाऱ्या औरंग्याच्या औलादी कोण? घोषणा देणाऱ्यांच्या पाठी कोण हे लवकरच बाहेर येईल, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

एमआयएमच्या रॅलीत औरंगजेबाच्या घोषणाबाजीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; घोषणा देणाऱ्या औरंग्याच्या औलादी कोण?
...उबाठा गटाने आपल्या तोंडाची 'गटारे' बंदच ठेवावीत; शेलारांचा हल्लाबोल

मी सातत्याने म्हणतोय औरंग्याच्या अवलादी पैदा कुठून होतात. शेवटी महाराष्ट्रात आणि देशात औरंगजेबाच्या रक्त कोणात नाही या ठिकाणचे जे मुस्लिम आहे तेही औरंगजेबाचे वंशज नाही. औरंगजेब हा या देशावर राज्य करण्यासाठी हिंदूंवर अत्याचार करण्यासाठी आपल्या माता-बहिणींची अब्रू लुटण्यासाठी इथे आला होता. त्याच्या अत्याचाराच्या गाथा या हजारो पाने लिहिता येतील इतक्या आहेत. त्यामुळे असा औरंगजेब कुठल्या राष्ट्रीय मुसलमानाचा मानक होऊ शकत नाही.

जे असे घोषणा देत आहेत अशा प्रकारच्या औरंग्याच्या अवलादी या नेमक्या कोण आहेत? त्याच्या पाठीमागे कोण आहे? त्याच्या पाठीमागे त्याचा इरादा काय? ते महाराष्ट्रात काय घडवून इच्छिता हे देखील लवकर बाहेर येणार, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हंटले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राजकीय संस्कृती कुठे जातंय याचा विचार करायला पाहिजे मी काल एक ट्विट केलं त्याला मिळालेला समर्थन मला असं वाटतं की आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडणार आहे. त्याच्यावरून तरी उद्धव ठाकरेंनी समजून घ्यायला पाहिजे की लोकांना काय अपेक्षित आहे, असा निशाणा फडणवीसांनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com