प्रभू रामाचा धनुष्यबाण घेऊन आलोयं; एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना डिवचले

प्रभू रामाचा धनुष्यबाण घेऊन आलोयं; एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना डिवचले

कनाथ शिंदे यांनी तेथील जनतेशी संवाद साधत आभार व्यक्त केले.
Published on

लखनऊ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अयोध्या दौऱ्यावर असून श्रीरामाच्या चरणी लीन झाले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी तेथील जनतेशी संवाद साधत आभार व्यक्त केले. तसेच, राम मंदिरावरुन एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर शरसंधान साधले. प्रभू रामाचा धनुष्यबाण घेऊन आलो आहे याचा आनंद आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाला डिवचले आहे.

प्रभू रामाचा धनुष्यबाण घेऊन आलोयं; एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना डिवचले
'तो' फोटो अंडरवर्ल्ड लोकांसोबत आहे का? अजित पवार संतापले

सकाळपासून अयोध्या पूर्ण भगवामय झाली आहे. रामभक्त सर्व कानाकोपऱ्यातून अयोध्येत आले आहेत. मी त्यांचा आभारी आहे. रामलल्लांचे दर्शन घेऊन मंदिराचे निर्माण कार्याची आम्ही पाहणी केली.रवी राणा अयोध्येची माती घेऊन अमरावतीत जाणार आहेत आणि 111 फुटी हनुमानाच्या मुर्तीची स्थापना करणार आहेत. पण, आम्हाला याचा आनंद आहे की प्रभू रामाचा धनुष्यबाण घेऊन आलो आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हंटले आहे.

हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते की अयोध्येत भव्य राम मंदिरांचे निर्माण व्हावे. अनेक जण म्हणायचे, आधी मंदिर नंतर सरकार. मंदिर वही बनायेंगे पर तारीख नही बतायेंगे. पण सर्वांना बाजूला सारत पंतप्रधान मोदींनी राम मंदिराचे निर्माणकार्य सुरु केले व तारीखही सांगितले आहे. आणि जे विचारत होते त्यांना घरचा रस्ताही दाखवला आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. तसेच, राम मंदिरात खारीचा वाटा म्हणून महाराष्ट्रातून सागवान लाकूड दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी रावणराज म्हणत एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली होती. याला प्रत्युत्तर देखील एकनाथ शिंदेंनी यावेळी दिले. रामभक्त हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांना रवी राणा व नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकण्याचे पाप केले होते. ते राम का रावण तुम्हीच सांगा. त्यांच्या काळात साधू हत्याकांड झाले होते. परंतु, आमच्या काळात असे होणार नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com