'नऊ महिने झाले बाळ व्हायला आलय, उद्धव ठाकरे किती दिवस बोलणार सुनबाई-सुनबाई'

'नऊ महिने झाले बाळ व्हायला आलय, उद्धव ठाकरे किती दिवस बोलणार सुनबाई-सुनबाई'

गुलाबराव पाटलांचा उध्दव ठाकरेंना खोचक चिमटा

मुंबई : भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरुन ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अशातच, आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील मोठे नेते त्यांच्या बोलण्यात चूक झाली असेल, असे म्हणत त्यांनी पाठराखण केली. तर, नऊ महिने झाले बाळ व्हायला आलय उद्धव ठाकरे किती दिवस बोलणार सुनबाई-सुनबाई, असा चिमटा गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना काढला आहे.

'नऊ महिने झाले बाळ व्हायला आलय, उद्धव ठाकरे किती दिवस बोलणार सुनबाई-सुनबाई'
महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल झाल्याशिवाय राहणार नाही : बावनकुळे

काय म्हणाले होते उध्दव ठाकरे?

काल चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. पाटलांची हकालपट्टी व्हायला हवी, अशी मागणी उध्दव ठाकरेंनी केली होती.

कुणाची हकालपट्टी करावी हे बोलण्याचा कोणालाही अधिकार नसून चंद्रकांत पाटील हे मोठे नेते असून त्यांच्या बोलण्यात चूक झाली असेल. मात्र, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही, असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तर, बाळ व्हायला नऊ महिने झाले मात्र उद्धव ठाकरे किती दिवस सुनबाई सुनबाई बोलणार, असा चिमटाही त्यांनी उद्धव ठाकरेंना काढला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com