तुमच्या धर्माने शिवरायांचा राज्याभिषेक का नाकारला? भागवतांच्या 'त्या' विधानावर आव्हाडांचा पलटवार

तुमच्या धर्माने शिवरायांचा राज्याभिषेक का नाकारला? भागवतांच्या 'त्या' विधानावर आव्हाडांचा पलटवार

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाने नवा वाद निर्माण झाला असून यावर जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे.

मुंबई : छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले होते. यावरुन आता नवा वाद निर्माण झाला असून विरोधकांकडून भागवतांवर टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मोहन भागवतांवर टीकास्त्र डागले आहे.

तुमच्या धर्माने शिवरायांचा राज्याभिषेक का नाकारला? भागवतांच्या 'त्या' विधानावर आव्हाडांचा पलटवार
बच्चू कडूंना सत्तेतून बाहेर काढा; भाजप पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी, नेमकं प्रकरण काय?

छत्रपती शिवरायांनी कधीही धर्माच्या नावाने राज्य केलं नाही असं कोणत्याही इतिहासात नोंद नाही. शिवरायांचा धर्म महाराष्ट्र धर्म होता त्याचा पालन करावे, अशी त्यांची इच्छा होती. शिव धर्माचा आणि महाराष्ट्र धर्माचा पालन केलं तर जाती धर्म देश बंद होईल. शिवधर्म, महाराष्ट्र धर्मामध्येच आपल्या सगळ्यांचे हित आहे त्याचा पालन आपल्याला करावा लागेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले आहे.

कर्मकांडाच्या विरोधामध्ये शिवराय होते. तुमच्या हिताच्या राजकारण आणि तुमच्या जागा जास्त निवडण्यासाठी महाराष्ट्र धर्म नव्हे. ज्यांनी राज्याभिषेकाला विरोध केला ज्यांनी शिवाजी महाराजांच्या कपाळावरती अंगठ्याने कुंकू लावले ते आम्हाला सांगणार. तुमच्या त्या धर्माने शिवरायांचा राज्याभिषेक का नाकारला त्याचे उत्तर द्या, असा सवालही आव्हाडांनी मोहन भागवतांना विचारला आहे.

काय म्हणाले होते मोहन भागवत?

छत्रपती शिवाजी महाराज हे काळाहून पुढचा विचार करायचे. या देशाबद्दल आपुलकीचे नाते ठेवणाऱ्यांना त्यांनी सुरक्षित केले. तेच तर हिंदवी स्वराज्य आहे आणि त्यालाच आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतो, असे सरसंघचालक म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com