उद्धव ठाकरेंना अडवण्याचा प्रयत्न झाला तर...; राजन साळवींचा नारायण राणेंना इशारा

उद्धव ठाकरेंना अडवण्याचा प्रयत्न झाला तर...; राजन साळवींचा नारायण राणेंना इशारा

कोकणातील बारसू रिफायनरी विरोधात आंदोलन तापले आहे. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे 6 मे रोजी बारसू येथे भेट देणार असून आंदोलकांशी संवाद साधणार आहे.

निसार शेख | रत्नागिरी : कोकणातील बारसू रिफायनरी विरोधात आंदोलन तापले आहे. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे 6 मे रोजी बारसू येथे भेट देणार असून आंदोलकांशी संवाद साधणार आहे. तर, नारायण राणेंनी उद्धव ठाकरे कोकणात आले तर त्यांना कोकणातून पळवून लावू, असा धमकी दिली होती. याला ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंना अडवण्याचा प्रयत्न झाल्यास जशास तसे उत्तर, असा इशाराच त्यांनी नारायण राणेंना दिला आहे.

उद्धव ठाकरेंना अडवण्याचा प्रयत्न झाला तर...; राजन साळवींचा नारायण राणेंना इशारा
अध्यक्ष नसलेला पक्ष; निलेश राणेंनी राष्ट्रवादीची उडवली खिल्ली, ठाकरेंवरही प्रहार

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 6 तारखेला राजापूर येथे येणार आहेत. नारायण राणे आणि त्यांच्या पिल्लावळांनी त्यांना अडवण्याची भाषा करू नये. ज्या पक्षामुळे नारायण राणे यांना मानसन्मान मिळाला. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या बाळकडू मुळेच त्यांच्यात ही हिंमत आलेली आहे, असे राजन साळवी यांनी म्हंटले आहे. भाजपला खुश करण्यासाठीच नारायण राणे यांनी सुपारी घेतली आहे की काय असे आम्हाला वाटते, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.

पहिल्यांदा आमच्याशी लढा मग माननीय उद्धव साहेबांना अडवण्याची भाषा करा. जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही राजन साळवींनी नारायण राणेंना दिला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सहा तारखेला येऊन बारसू व इतर गावातील लोकांशी संवाद साधतील आणि बारसु रिफायनरी संबंधी आपली भूमिका स्पष्ट करतील, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, उध्दव ठाकरेंनी वज्रमुठ सभेतून बारसूवर भाष्य केले. बारसूबद्दल मी बोलणार आहे, आणि फक्त इकडेच नाही तर येत्या सहा तारखेला बारसूमध्ये जाऊन तेथील लोकांना भेटुन बोलणार आहे. कस काय तुम्ही मला अडवु शकता? तो काही पाकव्याप्त काश्मिर नाही किंवा बांग्लादेश नाही. तो महाराष्ट्रातील रत्नागिरीचा भाग आहे, मी बारसूला जाणार, असे त्यांनी जाहीर केले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com