Eknath Shinde
Eknath ShindeTeam Lokshahi

विरोधकांचा देशद्रोही म्हणून उल्लेख; मुख्यमंत्र्यांचे भाष्य, हा गुन्हा असेल तर मी पुन्हा करेन

अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग नोटीस दाखल केली होती. यावर आता एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले.

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाने चहापानावर पत्र देऊन बहिष्कार टाकला. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशद्रोहयांसोबत चहापान करणे आपण टाळले, असे वक्तव्य केले. विरोधी पक्षांचा देशद्रोही म्हणून केलेला उल्लेख हा विधानसभेचा अवमान असल्याचे म्हणत अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग नोटीस दाखल केली होती. यावर आता एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. विरोधी नेत्यांबद्दल माझं ते वक्तव्य नव्हते, असे त्यांनी म्हंटले आहे.

Eknath Shinde
पुण्यात भाजपने बालेकिल्ला गमावला! फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

नवाब मलिक यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. देशद्रोही दाऊद इब्राहिम, हसीना पारकर यांच्यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल झाला. हसीना पारकर या दाऊद इब्राहिम यांच्या बहीण आहेत. हसीना पारकर, सरदार खान यांच्याकडून नवाब मलिक यांनी जामीन घेतली. याप्रकरणी नवाब मलिक यांना 2022 रोजी कोठडी झाली. ते सुप्रीम कोर्टात गेले आणि 22 मार्च 2022 रोजी त्यांचा जामीन रद्द केला. दहशतवादी हल्लेखोरांशी त्यांचे संबंध होते. देशद्रोही यांच्याशी संबंध असलेले नवाब मलिक यांना मी बोललो. अशा लोकांना पाठीशी घालणाऱ्या लोकांशी चहा पिण्याच टाळलं. यात आम्ही महाराष्ट्र द्रोह काय केला, असा सवाल एकनाथ शिंदे विचारला आहे.

2019 रोजी मविआ सरकार मतदाराच्या विरोधात तयार केलं. आम्ही याच्या विरोधात भूमिका घेतली हा महाराष्ट्र द्रोह आहे का? किती काय काय आहे मी आता सांगू शकत नाही. महाराष्ट्र द्रोह आम्ही काय केलं? याची सुरुवात कोणी केली? नवाब मलिक यांचे समर्थन आहे का तुम्हांला? आम्ही त्या वेळेला मुख्यमंत्री यांना बोललो की नवाब मलिक यांचा राजीनामा घ्या. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला मग नवाब मलिक यांचा का नाही? म्हणून आम्ही त्यांना सोडलं, असेही त्यांनी म्हंटले आहे. तसेच, याला राजकीय रंग देण्याचे काम नाही. दहशतवादाला खतपाणी घालण याला मी देशद्रोही बोललो. हा जर गुन्हा असेल तर मी पुन्हा करेन, असा पलटवार एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com