'त्या' विधानावरुन मुख्यमंत्र्यांविरोधातच विधानपरिषदेत ठाकरे गटाची हक्कभंगाची नोटीस

'त्या' विधानावरुन मुख्यमंत्र्यांविरोधातच विधानपरिषदेत ठाकरे गटाची हक्कभंगाची नोटीस

संजय राऊतांवरील हक्कभंगाच्या नोटीसीला ठाकरे गटाकडून उत्तर

मुंबई : विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, असं धक्कादायक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यावरुन आज अधिवेशनात एकच गदारोळ झाला. संजय राऊतांवर हक्कभंगाचा आणण्याची जोरदार मागणी सत्ताधारी पक्षांकडून करण्यात आली आहे. तर, ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी अंबादास दानवेंनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली आहे. यावर आता काय निर्णय होणार सर्वांचेच लक्ष आहे.

'त्या' विधानावरुन मुख्यमंत्र्यांविरोधातच विधानपरिषदेत ठाकरे गटाची हक्कभंगाची नोटीस
हे 40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करू नये शोर; आठवलेंची खास कविता

संजय राऊत कोणत्या पार्श्वभूमीवर आणि कोणत्या व्यक्तीला बोलले हे तपासलं पाहिजे. मुख्यमंत्री हे परवा विरोधी पक्षाला देशद्रोही बोलले होते. हे कितपत योग्य आहे. याची देखील भूमिका स्पष्ट होणं महत्वाचे आहे. या संदर्भात तपासणी झाली पाहिजे. याचीही चौकशी झाली पाहिजे. त्यांच्यावर देखील कारवाई केली पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

तर, सुनील प्रभू म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाने चहा पानावर रितसर पत्र देऊन बहिष्कार टाकला. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी केलेले वक्तव्य हे दुर्दैवी असून देशद्रोहयांसोबत चहापान करणे आपण टाळले. हा देखील विरोधी पक्षाच्या आमदारांचा देशद्रोही म्हणून केलेला उल्लेख हा विधानसभेचा अवमान आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांना देशद्रोही म्हटलेले विधानसभेचे अध्यक्ष कसे सहन करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्याविरोधात विशेष अधिकार भंगाची सूचना उपस्थित केली आहे. अतुल भातखळकर यांनी नोटीस दिली आहे. यावर दोन दिवसांत चौकशी करुन बुधवारी ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे. उद्या दोन्ही नोटीसवर उपसभापती निर्णय घेणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com