अजित पवार सभेला शरीराने राहतील, मात्र मनाने...; शिंदे आमदाराच्या विधानाने चर्चांना उधाण

अजित पवार सभेला शरीराने राहतील, मात्र मनाने...; शिंदे आमदाराच्या विधानाने चर्चांना उधाण

शिंदे गटाचे आमदाराने अजित पवारांसंदर्भात मोठा दावा केला आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

सचिन बडे | छत्रपती संभाजीनगर : विरोधी पक्षनेते अजित पवार लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी सुरु होत्या. यावर अजित पवारांनी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला होता. परंतु, पुन्हा एकदा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवारांसंदर्भात मोठा दावा केला आहे. अजित पवार शरीराने वज्रमुठ सभेत असले तरी मनातून कुठे आहेत हे दोन-चार दिवसात कळेल, असे विधान त्यांनी केले आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार सभेला शरीराने राहतील, मात्र मनाने...; शिंदे आमदाराच्या विधानाने चर्चांना उधाण
रिफायनरी संघर्षाची गोष्ट मनाला वेदना देतीयं, महाराष्ट्र दिनानिमित्त सरकारने...; सुळेंची विनंती

संजय शिरसाट म्हणाले की, सर्वात जास्त त्रास अजित पवारांना होत असेल. खुर्ची कालपर्यंत ठेवायची का नाही हा संभ्रम होता. याआधी बनवलेल्या कमिटीमध्ये अजितदादांचे कुठेही नाव नव्हतं. अजित दादांना बोलावलं, असे संजय राऊत म्हणत आहेत. परंतु, ते काय बोलतील हा महत्वाचा प्रश्न राहणार आहे. अजित पवार सभेला शरीराने राहतील मात्र मनाने नाही. अजित दादांचा वज्रमुठ सभेला कवडीचाही इंटरेस्ट नाही. अजित पवार मनातून कुठे आहेत हे दोन-चार दिवसात कळेल, असे त्यांनी म्हंटले आहे.

अजितदादा सांभाळून पाऊल टाकत आहेत पहिले चुकलेले पाऊल पुन्हा चूक होता कामा नये हा निर्धार असावा. अजित पवारांच्या मनामध्ये पुढची घडामोडी ठामपणे आहे. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय ते बदलत नाहीत. काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल. अजितदादा निर्णय घेतील, असा दावा त्यांनी केला आहे.

दुर्दैवाने एकत्रित सर्वांना वज्रमुठ सभा घ्यावी लागतेय. आमची एकजूट आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. सभा घेऊन जर मत पडत असतील आणि वातावरण बदलत असेल तर हा त्यांचा गैरसमज, अशी टीकाही शिरसाटांनी महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेवर केली आहे.

दरम्यान, संजय शिरसाटांनी चंद्रकांत खैरेंवरही हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत खैरे महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाला कशाला आले होते? चंद्रकांत खैरे यांनी बकवास बोलणं बंद केलं पाहिजे. थोडं मॅच्युअर व्हायला हवं. चंद्रकांत खैरे यांच्या बोलण्याला कवडीची किंमत पक्षात आणि बाहेर नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com