शिवसेना भवनसुद्धा एकनाथ शिंदेंना मिळेल; रवी राणांचा मोठा दावा

शिवसेना भवनसुद्धा एकनाथ शिंदेंना मिळेल; रवी राणांचा मोठा दावा

उध्दव ठाकरेंना धक्का देत निवडणूक आयोगाने धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला दिले आहे.

सूरज दहाट | अमरावती : उध्दव ठाकरेंना धक्का देत निवडणूक आयोगाने धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला दिले आहे. हा एकनाथ शिंदे यांचा मोठा विजय मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष नेते रवी राणा यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. तसेच, आता शिवसेना भवनसुद्धा एकनाथ शिंदे यांना मिळेल, असा मोठा दावाही रवी राणा यांनी केला आहे.

शिवसेना भवनसुद्धा एकनाथ शिंदेंना मिळेल; रवी राणांचा मोठा दावा
'उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत जुळवून घ्यावे अन् शिवसेना वाचवावी'

एकनाथ शिंदेंसोबत 90 टक्के शिवसैनिक आहे. शिवसेना ही विचाराची संपत्ती आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या विचारांची संपत्ती एकनाथ शिंदेंसोबत आहे. आता शिवसेना भवनसुद्धा एकनाथ शिंदे यांना मिळेल, असाही दावा रवी राणा यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. तर, संजय राऊत यांनी मर्द व नामर्दाची गोष्ट करू नये. संजय राऊत स्वतः नामर्द आहे, असा घणाघातही त्यांनी केला आहे.

दरम्यान, नवनीत राणा यांनीही उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. अती करणाऱ्या लोकांची माती होते. आणि आता माती खाणाऱ्या लोकांचे दिवस आले आहेत. तर बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी डूबवली. आताही वेळ गेली नाही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसोबत जुळवून घ्यावे व शिवसेना वाचवावी, असा सल्लाच नवनीत राणा यांनी उध्दव ठाकरेंना दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com