Chandrakant Khaire
Chandrakant KhaireTeam Lokshahi

राणा आणि कडूंचा वाद नाटकी, चंद्रकांत खैरेंचा घणाघात

दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणारच नाही,त्यासोबत 40 गद्दार पुन्हा निवडणुन येणार नाहीत
Published by :
Sagar Pradhan

सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार वाद सुरु आहे. अशातच विविध कारणावरून राजकीय वातावरण एकदम तापलेले आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गट जोरदार निशाणा साधला आहे. सोबतच अनेक दिवसापासून चालू असलेल्या आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादावर देखील भाष्य केले आहे.

Chandrakant Khaire
लायकीत रहा, दम असेल तर...; शिवसेनेचा रवी राणांना आव्हान

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्यावरच बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील चालू असलेला वाद हा नाटकी असल्याचा आरोप यावेळी खैरे यांनी केला आहे.

पुढे बोलताना खैरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रीमंडळ भाष्य केले आहे. ते म्हणाले की, हा मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. मंत्रीपदासाठी एकमेकांमध्ये वादावादी सुरू आहे. दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणारच नाही. तसेच 40 गद्दार पुन्हा निवडणुन येणार नाहीत, असा दावाही खैरे यांनी केला.

बांगर यांचे सर्व अवैध धंदे उघड करणार

हिंगोलीमधील आमचे कार्यकर्ते आणि पदधिकारी मातोश्रीमध्ये भेटले होते. त्यांनी बांगर यांचे सर्व अवैध धंदे उघड करणार असे सांगितले होते. त्यांचे अवैध धंदे पोलिसांना माहिती आहेत. अवैध धंद्यातून बांगर पैसे कमावतात. अशा आमदारांना देवेंद्र फडणवीस आणि संघ परिवार हे सर्व कसे सहन करतात. त्यांना या सर्वांची जाणिव होईल आणि हे सगळे संपेल, असाही टोला त्यांनी लगावला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com