संजय शिरसाटांच्या अडचणी वाढणार? अंधारेंनी केला अब्रुनुकसानीचा दावा दाखल

संजय शिरसाटांच्या अडचणी वाढणार? अंधारेंनी केला अब्रुनुकसानीचा दावा दाखल

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

मुंबई : शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. अब्रुनुकसानीच्या नोटिसीला समाधानकारक उत्तर न दिल्याने सुषमा अंधारे यांनी न्यायालयात धाव घेतली असून शिरसाटांविरोधात दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकारचे दावे दाखल केले आहेत. याबाबत अंधारेंनी स्वतः माहिती दिली आहे. सत्ता असेल तर लोक मुजोर होतात सत्ताधाऱ्यांची मुजोरी आम्ही अनुभवली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

संजय शिरसाटांच्या अडचणी वाढणार? अंधारेंनी केला अब्रुनुकसानीचा दावा दाखल
बारसू रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यांचे महत्वपूर्ण विधान; कुठलाही प्रकल्प लादणार नाही

बेताल वक्तव्य करणाऱ्यांना कायदेशीर समज दाखवून देण्यासाठी शिवाजीनगर कोर्टात दावा दाखल केला. व 47 वकिलांनी माझं वकीलपत्र घेतलं. संविधानिक चौकट पार करणारी मी आहे. नोटिसीनंतर जो कालावधी असतो त्या कालावधीत आम्ही वाट बघितली. त्यानंतर आम्ही न्यायालयाची पायरी चढली. दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकारचे दावे दाखल केले आहेत. 156 / 3 नुसार अजून एक तक्रार करत आहोत. दबावाच्या सगळ्या पद्धती करून पाहिल्या चौकशीसाठी एक अधिकारी नेमला, असं सांगण्यात आलं. पण, कोण तो अधिकारी ते माहिती नाही, असे सुषमा अंधारेंनी सांगितचले आहे.

खोके, सत्ता पद हे आमच्या डोक्यात नाही. सत्ता असेल तर लोक मुजोर होतात सत्ताधाऱ्यांची मुजोरी आम्ही अनुभवली आहे. सरकारकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण, आम्ही वारंवार लढाई लढणार आहोत. शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराला समज देणे हाच आमचा यातून प्रयत्न असेल. या सर्व प्रक्रियेत मी बाईपणाचं कार्ड खेळणार नाही. तर, औरंगाबादच्या अधिकाऱ्यांमार्फत मला आमिष दाखवलं गेलं. अधिकाऱ्यांना अडचण होईल म्हणून मी त्यांचा उल्लेख करणार नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.

दरम्यान, संजय शिरसाट यांची सुषमा अंधारेंवर टीका करताना जीभ घसरली होती. ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. पण, तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत, असे विधान त्यांनी केले होते. यावरुन सुषमा अंधारेंनी शिरसाटांविरोधात 3 रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. याबाबत शिरसाटांना एक नोटीसही पाठविण्यात आली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com