उध्दव ठाकरेंना आणखी एक धक्का! माजी मंत्र्यांची कन्या भाजपात प्रवेश करणार

उध्दव ठाकरेंना आणखी एक धक्का! माजी मंत्र्यांची कन्या भाजपात प्रवेश करणार

उध्दव ठाकरेंचे निकटवर्तीय नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी कालच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे ठाकरेंच्या गोटात एकच खळबळ माजली होती.

मुंबई : उध्दव ठाकरेंचे निकटवर्तीय नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी कालच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे ठाकरेंच्या गोटात एकच खळबळ माजली होती. अशातच, आणखी एक धक्का ठाकरे गटाला मिळाला आहे. ठाकरे गटाच्या निष्ठावान नेत्यांपैकी माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या तनुजा घोलप भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर, राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंतराव पवार यांची कन्या अमृता पवार यांही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

 उध्दव ठाकरेंना आणखी एक धक्का! माजी मंत्र्यांची कन्या भाजपात प्रवेश करणार
पाण्यासाठी आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण; अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर

तनुजा घोलप यांनी काही दिवसांपुर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर तनुजा घोलप शिंदे गटात जाणार, अशा चर्चांना उधाण आले होते. परंतु, त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मात्र, सर्वांनाच धक्का देत तनुजा घोलप भाजपात प्रवेश करणार आहे. यामुळे ठाकरे तसेच शिंदे गटाला धक्का बसला आहे. आजच भाजपच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रवेश करणार आहेत. तनुजा घोलप देवळाली मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे समजत आहे.

तर, वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार यांचा देखील भाजपात प्रवेश होणार आहे. याशिवाय आणखी काही माजी आमदार यांच्या मुलांचा देखील भाजपात प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, भूषण देसाई यांनी बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. यावर सुभाष देसाई यांनी ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक असल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com