रिफायनरीबाबत ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका; लोकांच्या जीवाशी खेळून...

रिफायनरीबाबत ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका; लोकांच्या जीवाशी खेळून...

कोकणातल्या रिफायनरीबाबत ठाकरे गटाने आपली स्पष्ट केली भूमिका

मुंबई : कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज सकाळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याचंही सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. अशात, ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ठाकरे गटाच्या नेते भास्कर जाधव यांनी रिफायनरी प्रकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे.

रिफायनरीबाबत ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका; लोकांच्या जीवाशी खेळून...
पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका; तात्काळ सर्वेक्षण स्थगित करा - अजित पवार

राजापूर तालुक्यात प्रकल्प होणार असं वाटतं होते. त्यासाठी बारसूमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. मला केवळ सरकारला इतकंच सांगायचं आहे लोकांच्या जीवाशी खेळून, लोकांना गप्प करून सत्यापासून दूर जाऊन पक्ष वाढवणार असाल तर असा पक्ष कोकणात वाढणार नाही. कोकणातील जनता अत्यंत चिकित्सू आणि अभ्यासक आहे. खरं काय आणि खोटं काय हे समजून घेणारी ही जनता आहे.

एक लाख लोकांना प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार आहे. तर मग खुलेआम चर्चा घडवा आणि लोकांना कशा नोकऱ्या देणार हे जनतेला खुलेआमपणे सांगावं. शिवसेनेची भूमिका ठाम आहे जे जनतेला हवा आहे तेच शिवसेना करते, असे भास्कर जाधवांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांची आणि शिवसेनेची भूमिका कधीच बदलेली नाही. नाणारला होणारा प्रकल्प हा देवेंद्र फडणवीस यांच्या सहीने रद्द झाला. मग भूमिका आम्ही नाही त्यांनी बदलली. आम्ही लोकांच्या भावानांशी राजकारण करणाऱ्यातले नाही आहोत. पण लोकांच्या सोबत कायम आहोत. लोकांशी असं वागून भाजपचा पक्ष कोकणात वाढणार नाही, असेही त्यांनी म्हंटले.

दरम्यान, राजापूर तालुक्याचे तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. पोलिसांनी जवळपास दोन हजारांचा फौजफाटा तैनात केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com