मुंबईतील जिम ट्रेनरच्या घरी एनसीबीचा छापा, गांजा-चरस आणि एलएसजीसह अनेक ड्रग्ज जप्त
ncb raid : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) पथकाने शनिवारी मुंबई घाटकोपर भागातील पॉवरलिफ्टर आणि जिम ट्रेनर शुभम भगत यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी गांजा, चरस आणि एलएसजीसह इतर अमली पदार्थ जप्त करण्यात आले. एनसीबीने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने शुभमला दोन दिवसांची एनसीबी कोठडी सुनावली. (ncb raid powerlifter gym trainer subham bhagat recovered various drug mumbai)
याप्रकरणी एनसीबीच्या पथकाने शुभम भगतची चौकशी सुरू केली आहे. त्यानंतर जी माहिती समोर येईल त्याआधारे कारवाई केली जाईल. या ड्रग्ज रॅकेटमागे आणखी लोकांचा हात असल्याचा संशय आहे. याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
सीबीसीएसच्या तस्करीत सहभागी असलेल्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
काही दिवसांपूर्वी, एनसीबीने मुंबईत प्रतिबंधित कोडीन आधारित खोकला सिरप (CBCS) तस्करीत गुंतलेल्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून सुमारे 50 लाख रुपयांचे अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. सतत देखरेख केल्यानंतर, एनसीबीने या टोळीतील प्रमुख सदस्य, त्यांची भूमिका, कार्यप्रणाली, आर्थिक स्रोत आणि विविध ऑपरेशनल तपशील गोळा केले.
एनसीबीच्या म्हणण्यानुसार, सीबीसीएसची खेप मूळतः मुघलसराय येथून उत्तर प्रदेशातील वाराणसी मार्गे बनावट पत्त्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्रातील पुणे येथे पाठवली जात होती. सीबीसीएसची ही खेप पुणे रेल्वे स्थानकावर प्राप्त झाली. यानंतर स्थानिक तस्करांच्या माध्यमातून मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पाठवण्यात येणार होते.