रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट - शिंदे गट आमनेसामने?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट - शिंदे गट आमनेसामने?

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने येणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने येणार असल्याची माहिती मिळत आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने येणार असल्याची चर्चा केली जात आहे.

दिपक केसरकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचा उमेदवार रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातून उभा राहू शकतो. असे ते म्हणाले. विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील विद्यमान खासदार असून ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. .रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची ताकद तुलनेने खूपच कमी आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.

कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासह बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा देखील समावेश आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची युती झाल्यास भाजप ही जागा शिंदे गटासाठी सोडणार का? अशा चर्चा देखील आता होऊ लागल्या आहेत. 16 लोकसभा मतदारसंघांवर भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केलं असल्याचे सांगितले जात आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट - शिंदे गट आमनेसामने?
५० खोके घेतल्याचा आरोप अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंना भोवणार का?; शिंदे गटाने घेतला मोठा निर्णय
Lokshahi Marathi
www.lokshahi.com