विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावणे हे ढोंगच; सामनातून हल्लाबोल

विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावणे हे ढोंगच; सामनातून हल्लाबोल

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील शिवसेना भवन चारही बाजूंनी रंगीबेरंगी रोषणाईने सजले आहे. या निमित्तानं दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर फुलांनी सजावट करण्यात आली आहे. आजच्या दिवशी स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी अनेक शिवसैनिक, कार्यकर्ते, मान्यवर दाखल होत आहेत. मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचं जाहीर केलं होतं. याच दिवसाचं औचित्य साधत आज विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरणही करण्यात येणार आहे. या तैलचित्राच्या कार्यक्रमासाठी ठाकरे कुटुंबातील सगळ्यांनाच निमंत्रित करण्यात आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, बाळासाहेब ठाकरे हे पुण्यवान अमर आत्मा आहेत. त्यांचे चित्रं लोकांच्या हृदयावर कोरले गेले असून ते प्रामाणिक आहे. स्वाभिमानाचा कुंचला आणि निष्ठेच्या रंगाने हे चित्र अमर झाले आहे. विधानसभेत बाळासाहेबांचे तैलचित्र लावणे हे एक ढोंग आहे. त्या तैलचित्रात निष्ठेचा आत्मा आणि तेज नसल्याने 40 बेईमानांच्या ढोंगाशिवाय या सोहळ्यात दुसरे काहीच दिसत नाही. असे सामनातून म्हटले आहे.

विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावणे हे ढोंगच; सामनातून हल्लाबोल
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती

यासोबतच भाजपने एक पेंढा भरवलेला कोल्हा खुर्चीवर बसवलेला आहे. त्या कोल्ह्याला काडीची किंमत नाही. लाचारी आणि गुलामीची हद्द पार करत त्यांनी आम्ही मोदींची माणसं आहोत, असं जाहीर केलं. त्यामुळे शिवसेना खतम करण्याचे किती मोठे कारस्थान भाजप आणि त्यांच्या हस्तकांनी केलं हे कळलंच असेल. आमचे नाते मोदींशी आहे असं सांगणारे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव का घेत आहेत? विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्याचं ढोंग रचलंय ते कशासाठी? एक तर तैलचित्रात निष्ठेच्या तेजाचा अंश नाही. ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेच्या बाबतीत बेईमानी केली, त्याच विधानसभेत तैलचित्र लावून महाराष्ट्रापुढे कोणतं चित्रं रंगवत आहात? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावणे हे ढोंगच; सामनातून हल्लाबोल
बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचितच्या युतीची आज घोषणा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com