कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी काँग्रेसकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. या प्रसंगी खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील आणि काँग्रेसच्या अन्य सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकींचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये मुरगूड, जयसिंगपूर, हातकणंगले, कुरुंदवाड यासारख्या ठिकाणी शिंदे गटाने विजय मिळवला.
खराब रस्त्यांवर टोल आकारला जाऊ नये असे स्पष्ट आदेश देऊनही कोल्हापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले विस्तारीकरणाचे काम आणि महाकाय खड्ड्यांमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.