पावसाबरोबरच, परिसरातील धरणांमधून पाणी सोडण्याचे काम सुरू आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी नद्यांकडे सोडले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. पावसानं राज्यभरात धुमाकूळ घातलेला असतानाच आता भारतीय हवामान विभागाच्या नव्या अंदाजानं चिंता वाढवली आहे.