Virat Kohli | BCCI | Mushtaq Ahmed
Virat Kohli | BCCI | Mushtaq Ahmedteam lokshahi

विराट कोहलीला संघातून काढण्यावरून पाकिस्तानी प्रशिक्षकांचा बीसीसीआयला इशारा

कोहलीला संघातून काढायचे की नाही, या चर्चेलाही जोर
Published by :
Shubham Tate

Virat Kohli Mushtaq Ahmed : विराट कोहलीचा खराब फॉर्म हा सध्या क्रिकेट जगतासाठी सर्वात मोठा मुद्दा बनला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या विजय किंवा पराभवापेक्षा विराट कोहली धावा का करू शकत नाही याचीच चर्चा आहे. आता कोहलीला संघातून काढायचे की नाही, या चर्चेलाही जोर आला आहे. अशी मागणी कपिल देव यांच्यासह काही भारतीय दिग्गजांनी केली आहे. आता याला पाकिस्तानातूनही काढून टाकण्याची मागणी होऊ लागली आहे. (virat kohli poor form rest drop mushtaq ahmed warning bcci jonathan trott situation)

Virat Kohli | BCCI | Mushtaq Ahmed
Driving Licence Rule : ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं झालं सोपं, नियमात केले बदल

पाकिस्तानचे माजी फिरकीपटू आणि सध्याचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक मुश्ताक अहमद यांचे मत आहे की विराट कोहलीला वगळले पाहिजे, परंतु त्यामागे त्याने दिलेले कारण बाकीच्यांपेक्षा वेगळे आहे. मुश्ताकने खरं तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) कोहलीला संघातून वगळण्याचा इशारा दिला आहे.

Virat Kohli | BCCI | Mushtaq Ahmed
कार घ्यायचा विचार करताय, मग आधी ही बातमी वाचा

दरम्यान, रोहित शर्मा संघासाठी सातत्याने सामने जिंकत होता तेव्हा त्याचे सर्वत्र कौतुक होत होते. विश्वचषक २०२१ नंतर, रोहित शर्मा क्रिकेटचा कर्णधार बनला, तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याला कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद मिळाले. रोहितने T20I मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले, तेव्हा त्याची विजयाची मालिका 19 होती, प्रत्येकजण त्याच्याकडून रिकी पाँटिंगचा सलग 20 विजयांचा विश्वविक्रम मोडेल अशी अपेक्षा करत होता. पण असे घडले नाही आणि अखेरच्या टी-२०मध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com