world cup 2023,IND vs NZ
world cup 2023,IND vs NZTeam Lokshahi

2019चा बदला भारत घेणार का? आज होणार भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यांत सर्वोत्तम कामगिरी करणारे व प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व गाजवणारे भारत आणि न्यूझीलंड हे तुल्यबळ संघ आज, रविवारी आमनेसामने येणार आहेत.
Published by :
Sagar Pradhan

मुंबई: सध्या भारतात मोठा उत्साहात एकदिवसीय विश्वचषक 2023 सुरू आहे. याच विश्वचषकातील आज 21 सामना दोन मोठ्या संघांमध्ये होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना रविवारी 22 ऑक्टोबरला धर्मशाळा येथील एचपीसीएच्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्हीही संघाने आतापर्यंत कुठल्याही पराभवाचा सामना केलेला नाही. तर दुसरीकडे भारतीय संघ 2019 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवाच्या बदल्याच्या भूमिकेत असेल. त्यामुळे या सामन्याकडे दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे.

world cup 2023,IND vs NZ
भारतीय संघाला मोठा धक्का! न्यूझीलंडसोबतच्या सामन्याआधी हा मोठा खेळाडू संघाबाहेर...

कधी, कुठे असे हा सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यांत आज विश्वचषकातील 21 सामना पार पडणार आहे. धर्मशाळा येथील एचपीसीएच्या क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना होईल. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.

असे असतील दोन्ही संघ?

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

न्यूझीलंड संघ:

टॉम लॅथम (कर्णधार), केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोढी, टीम साउथी आणि विल यंग.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com