थोडक्यात
ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्यावर गोळीबार
गोळीबारात चार्ली कर्क यांचा मृत्यू
गोळीबार करणाऱ्याला घटनास्थळावरून अटक
(Charlie Kirk) अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते चार्ली कर्क यांची युटा व्हॅली विद्यापीठात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. 31 वर्षीय कर्क ‘अमेरिकन कमबॅक’ या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांसमोर भाषण करत होते. त्याचवेळी अचानक झालेल्या गोळीबारात त्यांच्या मानेला गोळी लागली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या हल्ल्यानंतर कार्यक्रमस्थळी मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावताना दिसले. पोलिसांनी घटनास्थळ सील केले असून प्राथमिक तपासात जवळील इमारतीच्या गच्चीवरून गोळीबार करण्यात आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
चार्ली कर्क हे "टर्निंग पॉइंट" या संघटनेचे सह-संस्थापक होते आणि ट्रम्प यांच्या राजकीय मोहिमांमध्ये सक्रिय सहभागी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच अमेरिकेत रविवारपर्यंत राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "चार्ली कर्क हा एक उत्तम आणि धाडसी व्यक्ती होता, त्याच्या आत्म्यास शांती लाभो."