RAJASTHAN JALORE PANCHAYAT BANS SMARTPHONE USE FOR WOMEN AND GIRLS 
देश-विदेश

Smartphone Ban: राजस्थानमधील 'या' गावांमध्ये महिलांना स्मार्टफोन वापरावर बंदी, जालोर पंचायतीचा आदेश

Rajasthan News: राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील गावांमध्ये महिलांना व मुलींना स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील गाजीपूर गावात महिलां आणि मुलींवर मोबाईल फोन वापरावर घातलेल्या कडक बंदीने वादळ उभे राहिले आहे. गाव पंचायतीने घेतलेल्या निर्णयानुसार, २६ जानेवारीपासून १५ गावांमध्ये सुना आणि मुलींना स्मार्टफोन किंवा कॅमेरा असलेले फोन वापरण्यास पूर्णपणे मनाई असेल. त्यांना फक्त कीपॅड फोन वापरण्याची मर्यादित परवानगी मिळेल.

सुजानराम चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील चौधरी समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंचायतीने स्पष्ट केले की, लग्न, सामाजिक कार्यक्रम किंवा शेजाऱ्यांच्या घरी जाण्यापासून ते बाहेरील कोणत्याही ठिकाणी मोबाईल फोन नेणे महिलांना आणि मुलींना बंदी आहे. अभ्यासासाठी मोबाईलची गरज असल्यास फक्त घरीच वापरता येईल, तर शाळा किंवा इतर बाहेरील कार्यक्रमांमध्ये हा वापर पूर्णपणे प्रतिबंधित राहील.

पंच हिम्मतराम यांनी सांगितले की, या निर्णयाचे मुख्य कारण महिलांच्या फोनचा गैरवापर टाळणे आणि मुलांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होऊ देणार नाही, हे आहे. सुजानराम चौधरी यांनी स्पष्ट केले की, मुली अनेकदा महिलांच्या फोनचा अनधिकृत वापर करतात, ज्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होते आणि अभ्यासावर परिणाम होतो. म्हणूनच ही बंदी अत्यावश्यक ठरते.

ही बंदी केवळ गाजीपूर गावापुरती मर्यादित नसून, १४ उपविभागांतील एकूण १५ गावांमध्ये लागू होईल. प्रजासत्ताक दिनापासून (२६ जानेवारी) समाजातील सर्व महिला आणि मुलींना या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. या निर्णयाने स्थानिक पातळीवर चर्चेला उधाण आले असून, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटना यावर टीका करत आहेत.

  • जालोर जिल्ह्यातील १५ गावांमध्ये महिलांना स्मार्टफोन वापरास बंदी

  • २६ जानेवारीपासून कीपॅड फोनलाच मर्यादित परवानगी

  • पंचायतीने अभ्यास व गैरवापर टाळण्याचे कारण दिले

  • महिला संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांकडून निर्णयावर टीका

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा