महाराष्ट्र शाहीर Team Lokshahi
मनोरंजन

‘शाहीर साबळे’ यांच्या भूमिकेत अंकुष चौधरी; जाणून घ्या...

'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले

Published by : Saurabh Gondhali

शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे (shahir sable) म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी गीत.. प्रत्येकच गाणं हे माणसाच्या काळजात हात घालणारं. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली 'महाराष्ट्राची लोकधारा' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. शाहीर साबळे यांच्या पश्चात हा वारसा त्यांचा नातू म्हणजेच दिग्दर्शक केदार शिंदे पुढे नेत आहेत आणि आता तर शाहीर साबळे यांच्या जीवनावर ते चित्रपट करत आहेत.

या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण रविवार औरंगाबाद येथील सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी केदार शिंदे, अंकुश चौधरी उपस्थित होते. यावेळी 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) या चित्रपटाचे टिझर दाखवण्यात आला. शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अंकुश चौधरी असल्याचे जाहीर होताच चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला अजय अतुल (ajay atul) यांचे संगीत असणार आहे.

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अंकुश चौधरीने शाहीर साबळे यांच्यासोबत काम केले आहे. केदार शिंदे, भारत जाधव, अंकुश चौधरी ही मंडळी शाहीर सांबळे यांच्या कला पथकातूनच पुढे आली आहेत. त्यामुळे अंकुशसाठी ही भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?