मनोरंजन

अनुपसिंग आणि मृण्मयी या जोडीचा "बेभान" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Published by : Siddhi Naringrekar

मराठी सिनेसृष्टीत अनेक नवनवीन विषय हाताळले जात असून हिंदी सिनेसृष्टीत आपले नशीब आजमावणारे कलाकारही आता मराठी सिनेसृष्टीकडे वळत असल्याचे आपण पाहिले आहे. आता यामध्ये आणखीन एका नावाची भर पडली आहे आणि ते नाव आहे अनुपसिंग ठाकूर. आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपण त्याचे काम पाहिले असून अनेक बॉडीबिल्डिंग स्पर्धांमधून देखील त्याने आपले नाव कमविले आहे. शशिकांत पवार प्रॉडक्शन प्रस्तुत अनुप जगदाळे दिग्दर्शित "बेभान" या आगामी चित्रपटातून मिस्टर वर्ल्ड अनुपसिंग ठाकूर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले

मधुकर ( अण्णा ) उद्धव देशपांडे आणि शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. "झाला बोभाटा", "भिरकीट" असे उत्तम चित्रपट केल्यानंतर "बेभान" हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे आपल्यासाठी घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. अनुप जगदाळे दिग्दर्शित आगामी "रावरंभा" या ऐतिहासिक चित्रपटाची चर्चा सुद्धा मनोरंजन क्षेत्रात कमालीची आहे.

"बेभान" चित्रपटाची कथा दिनेश देशपांडे यांची असून पटकथा नितीन सुपेकर यांची आहे. चित्रपटाचे छायांकन कृष्णा सोरेन यांचे असून संकलक म्हणून विजय कोचीकर यांनी काम पाहिले आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना ए व्ही प्रफुल्लचंद्र यांचे संगीत लाभले आहे. अनुपसिंग ठाकूर यांच्यासोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, स्मिता जयकर आणि अभिनेते संजय खापरे ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाच्या पोस्टरवरून जरी हा चित्रपट रोमॅंटिक असेल असा अंदाज बांधता येत असला तरी अभिनेता अनुपसिंग ठाकूर असल्याने चित्रपटात ऍक्शन देखील पहायला मिळेल का ? यासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. येत्या ११ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस; प्रकृती खालावली

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण