Dave Chappelle Team Lokshahi
मनोरंजन

चालू कार्यक्रमामध्ये कॉमेडीयन डेव्ह चॅपेलवर हल्ला

मंगळवारी स्टेजवर परफॉर्म करत असताना हॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन डेव्ह चॅपेल याच्यावर हल्ला

Published by : shamal ghanekar

मंगळवारी स्टेजवर परफॉर्म करत असताना हॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन डेव्ह चॅपेल याच्यावर हल्ला झाला. ही घटना लॉस एंजलिसमध्ये कार्यक्रम सुरू असताना घडली आहे. मंगळवारच्या रात्री Netflix is a joke या सोहळ्यादरम्यान ही घटना घडली आहे. यादरम्यान अनेक स्टँडअप कॉमेडियन तेथे सहभागी होते.

रॉयटर्सच्या वृत्तानूसार, डेव्ह चॅपेलशी (Dave Chappelle) झटापट करणाऱ्या व्यक्तीने कॉमेडियनवर (Comedian) बुधवारी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. जेव्हा डेव्हवर हल्ला झाला तेव्हा त्याच्याकडे चाकू आणि ब्लेड अशाप्रकारेची साधन होते असे लॉस एंजेलिस विभागातील पोलिस प्रवक्त्याने सांगितले आहे.

या हल्ल्यामध्ये डेव्हचे कोणतेही नुकसान झाले नसून त्याने या घटनेनंतरही हा शो ( show) सुरूचं ठेवला. आणि त्यांनंतर तो गंमतीमध्ये म्हणाला की, माझ्यावर हल्ला करणारा ट्रान्समेन होता. चॅपेलचे हे वक्तव्याने त्याच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण त्याचे हे वक्तव्याने त्याने ट्रान्सजेंडर समाजाचा रोष ओढावून घेतल्याने सर्वच स्तरावरून त्याच्यावर टीका केली जात आहे.

चॅपेलवर झालेल्या हल्लानंतर त्याची प्रकुती ठीक असून हल्ला करणाऱ्याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याला 30 हजार डॉलर्सच्या जामिनावर अटक केली आहे.

व्हिडिओमध्ये (Video) तुम्ही पाहू शकता की एक अनोळखी व्यक्ती येते आणि कॉमेडीयनशी झटापट करून त्याला जमिनीवर पडते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."