दिग्दर्शक करण जोहर याच्या आगामी 'दोस्ताना 2' या सिनेमातून कार्तिक आर्यनची एक्झिट झाली असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत झळकणार होता. त्यामुळे कार्तिक आर्यनला बाहेरचा रस्ता दाखवण्याचे नेमके कारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कार्तिक आर्यनच्या चित्रपटातून एक्झिटविषयी अनेक कारणे समोर आली आहेत. कार्तिकला या चित्रपटाच्या तारखा आणि शेड्युल याबाबत तक्रारी होत्या. ज्यामुळे पुढे अनेक समस्या सुरू झाल्या. कार्तिकने या चित्रपटाचं शूटिंग कित्येक महिने पुढे ढकललं होतं असेही म्हटले जाते. हा चित्रपट सोडून त्याने राम माधवानीच्या 'धमाका' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. त्यामुळे करण त्याच्यावर चिडला होता.
धर्मा प्रॉडक्शन कार्तिक आर्यनबरोबर भविष्यात कधीच काम करणार नसल्याचे म्हटले आहे. यामागचे कारण कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यातला कलह असल्याचे बोलले जात आहे. तसेच कार्तिकमध्ये क्रिएटिव्ह मतभेद देखील झाले आहेत. मात्र, कार्तिकला चित्रपटातून काढून टाकण्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
करणा जोहरच्या 'दोस्ताना 2' मध्ये जान्हवी कपूर आणि लक्ष्य, कार्तिक आर्यनसोबत झळकणार होते. या चित्रपटाद्वारे लक्ष्य बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. कार्तिक आर्यनच्या जागी करण जोहर या चित्रपटात कोणता अभिनेता घेणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.