मनोरंजन

'प्रेम म्हणजे काय असतं' चित्रपटातून साताऱ्याच्या ऋतुजा टंकसाळेचं पदार्पण

साताऱ्याची ऋतुजा टंकसाळे ही नवोदित अभिनेत्री "प्रेम म्हणजे काय असतं" या चित्रपटातून पदार्पण करत आहे. नव्या दमाच्या कलाकारांनी केलेला 'प्रेम म्हणजे काय असतं' हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

साताऱ्याची ऋतुजा टंकसाळे ही नवोदित अभिनेत्री "प्रेम म्हणजे काय असतं" या चित्रपटातून पदार्पण करत आहे. नव्या दमाच्या कलाकारांनी केलेला 'प्रेम म्हणजे काय असतं' हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तख्त प्रॉडक्शनने 'प्रेम म्हणजे काय असतं' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रसाद दत्तात्रय इंगवले यांनी चित्रपटाचं लेखन,  दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी निभावली आहे. प्रेम ही संकल्पना अत्यंत वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे. उत्तम कथा, फ्रेश कलाकार, श्रवणीय संगीताचा मिलाफ या चित्रपटात झाला आहे.

ऋतुजा टंकसाळे ही साताऱ्याची तरुणी पहिल्यांदाच चित्रपटात अभिनय करत आहे. प्रेम म्हणजे काय असतं या चित्रपटात ऋतुजानं अपर्णा ही भूमिका केली आहे.ऋतुजाचे वडील रिक्षाचालक असून चित्रपटाची, अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातली ऋतुजा आपला पहिला चित्रपट प्रदर्शित होणार असल्यानं उत्साहात आहे. 'प्रेम म्हणजे काय असतं या चित्रपटातून मला खूप काही शिकायला मिळालं, चित्रपट हे माध्यम समजून घेता आलं. आता याच क्षेत्रात करिअर करायचं का हे ठरवलेलं नाही. पण संधी मिळाल्यास काम करायला नक्कीच आवडेल,' असं ऋतुजानं सांगितलं.

प्रेम म्हणजे काय असतं याचित्रपटातून निर्माते आणि दिग्दर्शकांनी अनेक नवोदित कलाकारांना या चित्रपटातून सुवर्ण संधी दिली असल्याने या चित्रपटातील कलाकारांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

FASTag : फास्टॅग नसल्यास आता वाहन काळ्या यादीत

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्री आज नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार

Pune : पुण्यात कोयते, तलवारी हातात घेत टोळक्याचा धुडगूस; 7 ते 8 जणांकडून तरुणावर कोयता, तलवारीने वार

Sanjay Gaikwad : आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण; संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल