मनोरंजन

अभिनेत्री सोनाली खरेच्या 'मायलेक' चित्रपटाची पहिली झलक आली समोर

Published by : Siddhi Naringrekar

आई मुलीचे नाते हे सर्वात जवळचे, खास असते. कधी त्या घनिष्ट मैत्रिणी असतात, तर कधीकधी त्यांच्यात रुसवे फुगवेही असतात. त्यातही मजा असते. याच गोड नात्याची गोष्ट सांगणारा 'मायलेक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या टिझरची पहिली झलक प्रदर्शित झाली आहे. सोनाली खरे आणि सनाया आनंद यांच्यातील सुदृढ नाते या टीझरमध्ये दिसत आहे.

यात आईला जितके मुलीचे कौतुक आहे, तितकेच कौतुक, विश्वास मुलीलाही तिच्या आईबद्दल आहे. या चित्रपट उमेश कामतही प्रमुख भूमिकेत आहे. ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत, प्रियांका तन्वर दिग्दर्शित 'मायलेक' चित्रपट येत्या १९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून सोनाली खरे या चित्रपटाची निर्माती आहे. तर कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत.

दिग्दर्शिका प्रियांका तन्वर म्हणतात, '' आई आणि मुलीचे नाते अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. यात धमाल, मजामस्ती, हसू आणि आसू, दुरावा अशा एखाद्या नात्यातील सगळ्या भावना आहेत. मुळात आई आणि मुलीचे नाते खूप नाजूक असते. या चित्रपटाची खासियत म्हणजे यात खऱ्या मायलेकी असल्याने त्यांच्यातील नैसर्गिक केमिस्ट्री पडद्यावर दाखवणे मला अधिकच सोप्पे झाले. सोनाली एक उत्तम अभिनेत्री आहेच. तिचा हा गुण सनायामध्येही आला आहे. तिचा हा पहिला चित्रपट आहे, असे कुठेही जाणवत नाही. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी आहे, परंतु प्रत्येक आईमुलीने हा चित्रपट आवर्जून पाहावा.''

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही"; नाशिकमध्ये उद्धव ठाकरे कडाडले

"इंडिया आघाडीच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य

"काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण करतं"; कल्याणच्या सभेत PM मोदींची तोफ धडाडली

दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना