Horoscope
Horoscope  Team Lokshahi
अध्यात्म-भविष्य

वृषभ राशिच्या लोकांसाठी आनंदाचा दिवस; जाणून घ्या तुमच्या राशीत काय?

Published by : Team Lokshahi

मेष - आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरुपाचा असेल. तुमची लोकप्रियता आज शिखरावर असेल, त्यामुळे तुमची सर्व कामं सहज पूर्ण होतील. तुम्ही परदेशात एखादा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला फोन कॉलद्वारे एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. घरापासून दूर नोकरीत काम करणारे लोक कुटुंबातील सदस्यांच्या आठवणीत राहतील.

वृषभ - आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा असेल. तुमच्या व्यावसायिक योजनांमधून तुम्हाला मोठा फायदा होईल. तुम्ही तुमची सगळी काम सुद्धा आज वेळेत पूर्ण कराल. इतरांना मदत करताना विचार करुन करास कारण त्यातही तुमचा स्वार्थ असल्याचा आरोप लोक करतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून तुम्हाला वाईट बातमी ऐकायला मिळू शकते.

मिथुन - आज तुम्ही एखाद्या सामाजिक कामासाठी आर्थिक मदत कराल. त्यामुळे तुमचं नाव होईल. नोकरीत काम करणाऱ्या लोकांना भूतकाळातील काही चुकांमुळे भीती वाटू शकते. ऑनलाइन व्यवसाय करणारे लोक आज मोठ्या ऑर्डर मिळ्याल्यामुळे आनंदी राहतील. एखाद्या गरीबाला मदत करण्याची संधी मिळाली तर नक्की करा.

कर्क - व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल. घराचे मालक बनण्याची तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते, कारण घर खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबात सुरू असलेल्या कलहामुळे तुमचं मन थोडंसं विचलित होईल. कोणाशीही कठोर भाषेत बोलणं तुम्हाला टाळावं लागेल.

सिंह - आज तुम्ही वृद्धांची सेवा कराल. गरिबांना मदत करण्यासाठी तुम्ही आज मोठे प्रयत्न कराल. योगायोगाने तुमच्या हातून काही चांगली कामं मागच्या काळात झालेली असल्यानं तुमचं उत्पन्नही आज मोठ्या प्रमाणात वाढेल. तुम्ही स्वतःसाठीही आज थोडा वेळ काढू शकाल. तुम्हाला सासरच्या मंडळींकडून भेटवस्तू मिळाण्याच्याही शक्यता आहेत.

कन्या - आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मात्र अशा ठिकाणी तिथे तुम्ही लोकांशी बोलताना अत्यंत विचारपूर्वक बोलणं गरजेचं आहे. तुमच्या समोर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत असतील, त्यातले योग्य स्त्रोत तुम्हाला निवडावे लागणार आहेत, अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांचं उत्पन्न आज चांगलंच वाढू शकतं. वरिष्ठांशी वाद घालणं आज तुम्हाला टाळावं लागेल.

तूळ - आजचा दिवस तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस असणार आहे. तुम्ही नोकरीत असाल तर तुमची पदोन्नती होऊ शकते. विद्यार्थी बौद्धिक आणि मानसिक ओझ्यापासून मुक्त होतील. शिक्षणासाठी परदेशात जायचंय त्या लोकांच्या पदरात आज निराशा पडू शकते.

वृश्चिक - आज तुम्ही चांगलेच उत्साही असाल. तुमची ताकद तुम्हाला चांगल्या कामात वापरावी लागेल. तसं केल्यास अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली तूमची कामं आज पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी काही लोक आज तुम्हाला त्रास देण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. त्यामुळे तुम्हाला सावध राहावे लागेल.

धनु - आजचा दिवस तुमच्या आत्मविश्वासात वाढ करणारा असेल. तुम्ही स्वत:चा स्वार्थ बाजूला ठेऊन इतरांना मदत करण्यावर जास्त विश्वास ठेवाल. त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. व्यवसायातील जोडीदाराकडून आज तुमची फसवणूक होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याचा योग आज येणार आहे.

मकर - आजचा दिवस तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित लाभ मिळवून देईल. आळस झटकून आज तुम्ही एखाद्या मोठ्या कामाची सुरुवात कराल. एखाद्या जुनाट अजाराने तुम्ही त्रस्त असाल तर तुमचा त्रास आज वाढू शकतो. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. त्यामुळे तुम्ही आर्थिक चिंता करणं सोडून द्याल.

कुंभ - व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा तणावपूर्ण असेल. विद्यार्थ्यांनी एखाद्या स्पर्धेत भाग घेतला तर त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याची प्रगती पाहून आज तुम्हाला मोठा आनंद होईल. कोणत्याही प्रकारची जोखीम घेणं आज तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे सावधगिरी बाळगा.

मीन - नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. कारण नोकरदार लोकांना आज बढती मिळू शकते. काही महत्त्वाच्या कामांसाठी तुम्हाला घरापासून दूर जावं लागू शकतं. ओळखीच्या लोकांपासून तुम्हाला आज थोडं सावध राहावे लागेल. तुम्ही केलेल्या एखाद्या चुकीमुळे कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्यावर रागावू शकतो.

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं

'अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील' अजितदादांच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची खरमरीत टीका