नदीमध्ये नाणे टाकणे, मांजर आडवी गेली तर तिथेच काही वेळ उभे राहणे, प्रसूतीनंतर 40 दिवसांचा नियम, अशा अनेक समजुती आहेत जे फार आधीपासून पाळले जातात. पण आपण त्या का पाळतो हेच आपल्याला माहित नाही. कोणतीही प्रथा उगाच बनवली जात नाही. त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असते. तरअशाच काही समजुती आणि त्यामागचे शास्त्रीय कारणांबद्दल जाणून घेऊया.
घराबाहेर आणि दुकानाबाहेर लिंबू आणि मिरची लटकवणे
अनेकजण आपल्या घराबाहेर आणि दुकानाबाहेर लिंबू आणि मिरची (Lemon and pepper) लटकवतात. असे केल्याने वाईट नजरेपासून बचाव होतो अशी मान्यता आहे. पण यामागचे शास्त्रीय कारण वेगळेच आहे. वास्तविक लिंम्बूमध्ये सायट्रिक ऍसिड (Citric acid) असते आणि मिरची तिखट असते. जेव्हा ते दाराबाहेर टांगले जाते तेव्हा आंबट आणि तिखट सुगंध कोळी आणि कीटक यांना घरात प्रवेश करण्यापासून थांबवते. हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे.
नदीत नाणी टाकणे
प्रवासादरम्यान जेव्हा रेल्वे किंवा बस नदीच्या पुलावरुन जाते तेव्हा अनेकजण त्या नदीच्या पात्रात नाणी टाकतात. पण ते असं का करतात याचे कारण आपल्याला माहीत नसते. तर पूर्वाच्या काळी तांब्याची नाणी (Copper coin) वापरली जात होती. तांब्यामध्ये पाणी शुध्द करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळी जेव्हा कोणी नदीच्या पुलावरुन जात असे तेव्हा ते पाणी शुध्द करण्यासाठी त्यात तांब्याचे नाणे टाकत असे. पण आज तांब्याचे नाणी नाहीत तरीही अंधश्रध्देने लोक नदीत नाणे टाकतात.
प्रसूतीनंतर 40 दिवसांचा नियम
जेव्हा एखाद्या महिलेची प्रसूती (woman's delivery) होते तेव्हा तिला 40 दिवस खोली बाहेर येऊ दिले जात नाही. याचे कारण असे की बाळाला जन्म दिल्यानंतर महिलेचे शरीर खूप अशक्त होते आणि तिची विशेष काळजी घेण्याची गरज असते. अशा परिस्थितीत तिने काम केले तर ती आणखी अडचणीत येईल. म्हणून तिला 40 दिवस खोली बाहेर येऊ दिले जात नाही.
मांजर आडवी जाणे
कुठेही जात असताना जर आपल्या समोरुन मांजर आडवी गेली तर तिथेच काही वेळ उभं राहून नंतरच पुन्हा प्रवास सुरु करावा. अशी मान्यता आहे. आपल्याकडे मांजर आडवी जाणे अशुभ मानले जाते.
पण पूर्वीच्या काळी लोक बैलगाडी आणि घोडे यांनी दूरवर प्रवास करत. रात्रीच्या वेळी जंगलातून मांजर जाताना दिसले तर तिचे डोळे चमकतात, यामुळे बैल आणि घोडे घाबरतात. त्यामुळे रस्त्यावरून मांजर जाताना पाहिल्यानंतर लोक काही वेळ प्रवास थांबवायचे आणि मांजर गेल्यावर पुन्हा प्रवास सुरु करायचे. हळुहळु या गोष्टीचा लोकांनी मांजर आडवे जाणे हे अशुभ मान्यता दिली.
स्मशानभूमीतून परतल्यानंतर अंघोळ करणे
स्मशानभूमीतून परतल्यावर सर्वजण आंघोळ करतात. वास्तविक, मृत शरीरात हानिकारक जीवाणू वाढतात. स्मशानभूमीत अशा अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. अशा स्थितीत तिथे उपस्थित असलेले लोक या जीवाणूंच्या संपर्कात येतात. त्यामुळे स्मशानभूमीतून परतल्यानंतर अंघोळ करणे आवश्यक आहे.