Lip Balm Team Lokshahi
लाईफ स्टाइल

नाजूक, मुलायम ओठांसाठी घरच्या-घरी बनवा Lip Balm; जाणून घ्या पद्धत

सौदर्यातील महत्वाचा भाग म्हणजे ओठ

Published by : Siddhi Naringrekar

सौंदर्यातील महत्वाचा भाग म्हणजे ओठ (LIPS). ते सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण त्यांची काळजी घेत असतात. बदलत्या हवामानात ओठांच्या अनेक तक्रारी जाणवतात.

या तक्रारींपासून दूर राहायचे असेल तर घरच्या घरी बनवा Lip Balm ज्यामुळे तुमचे ओठ मुलायम बनतील. जाणून घेऊयात Lip Balm बनवण्याची पद्धत

डाळींब (Pomegranate)

डाळींब हे असे फळ आहे ज्याच्यापासून आपण लिप बाम बनवू शकता. डाळिंब हे ओठांसाठी उत्तम आहे. 1 कप डाळिंबाच्या बियांचा रस काढा. आता त्यात अर्धा चमचा कोमट तूप टाका, नंतर 15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. नंतर हे मिश्रण मंद आचेवर घट्ट होईपर्यंत उकळा. पेस्ट घट्ट झाल्यावर पुन्हा 2 चमचे तूप घालून 1 मिनिट नीट ढवळा आणि ओठावर लिप बाम म्हणून वापर करा.

पपई- (Papaya)

पपईचा लिप बाम ओठांना गुलाबी ठेवण्यास मदत करतो. पपई बारीक करून त्याचा रस काढा. आता त्यात 1 चमचा कोमट तूप टाका आणि 1 मिनिट थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. नंतर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर उकळा आणि डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. नंतर तुमचा लिप बाम तयार होतो.

ड्रॅगन फ्रूट - (Dragon fruit)

ड्रॅगन फ्रूट ओठांचा ओलावा टिकवून ठेवण्याचे काम करते. ड्रॅगन फ्रूटचा रस काढा. आता व्हॅसलीन वितळवून ड्रॅगन फ्रूट ज्यूसमध्ये घाला. हे मिश्रण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि नियमितपणे ओठांवर लावा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक