लाईफ स्टाइल

घरच्या घरीच अशा प्रकारे बनवा 'कॉर्न फ्लोर'

भारत आणि ब्रिटनमध्ये मक्याच्या पावडरला “कॉर्न फ्लोअर” म्हणतात तर यूएसमध्ये ते कॉर्न स्टार्च म्हणून ओळखले जाते. इतर देश याला “कॉर्नमील” म्हणतात. कॉर्न फ्लोर हे स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या प्रमुख घटकांपैकी एक आहे.

Published by : shweta walge

भारत आणि ब्रिटनमध्ये मक्याच्या पावडरला “कॉर्न फ्लोअर” म्हणतात तर यूएसमध्ये ते कॉर्न स्टार्च म्हणून ओळखले जाते. इतर देश याला “कॉर्नमील” म्हणतात. कॉर्न फ्लोर हे स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या प्रमुख घटकांपैकी एक आहे. सूप पासून तर बेकिंग व स्नॅक्सच्या अनेक पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. कॉर्न फ्लोअरच्या वापरामुळे अनेक तळलेले पदार्थ कुरकुरीत आणि चविष्ट बनतात. जर एखाद्या पदार्थामध्ये कॉर्न फ्लोर वापरण्याची गरज असेल आणि नेमके ते संपले असेल तर अशावेळी त्या पदार्थाची चव नेहेमीसारखी जमत नाही. केवळ पाककृतींमध्येच नव्हे तर घरगुती ब्युटी ट्रीटमेंट्ससाठीही कॉर्न फ्लोअरचा वापर केला जातो.

आपण ज्वारीचे पीठ, कणिक, बेसन घरीच घरघंटीमध्ये दळू शकतो. पण कॉर्न फ्लोर मात्र आपण दुकानातूनच विकत आणतो. पण आपण घरीही कॉर्न फ्लोर बनवू शकतो. कॉर्न फ्लोर बनवण्याची कृती खूप सोपी आहे. जर तुम्हाला बाहेर मिळणाऱ्या कॉर्न फ्लोरपेक्षाही उत्तम कॉर्न फ्लोर घरी बनवायचे असेल तर त्यासाठी पुढील तुम्ही दोन रेसिपीज करून बघू शकता.

कॉर्न फ्लोर बनवण्याची पहिली पद्धत

कॉर्नफ्लोअर बनवण्यासाठी प्रथम ताजे मक्याचे कणीस घेऊन त्याचे दाणे काढून ते स्वच्छ करून दिवसभर उन्हात ठेवा. दुसऱ्या दिवशी एका भांड्यात १ लिटर पाणी गरम करा. पाणी गरम झाल्यावर त्यात कॉर्नचे दाणे घालून साधारण 15-20 मिनिटे उकळा.पाणी थंड झाल्यावर मक्याच्या दाण्यांची साले काढून टाकून दाणे हाताने मॅश करा त्यानंतर ते मक्याचे दाणे मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या आणि एका भांड्यात काढा.आता या पेस्टमध्ये एक ते दोन कप पाणी घालून चांगले मिसळा आणि जाड कपड्याने गाळून घ्या. गाळून घेतलेले पाणी एक ते दोन दिवस उन्हात ठेवावे. दोन दिवसांनी तुम्हाला कॉर्नफ्लोर तयार झाल्याचे दिसेल.

कॉर्नफ्लोर बनवण्याची दुसरी पद्धत

यासाठी सर्वप्रथम सुके (ड्राय) मक्याचे दाणे एक-दोनदा स्वच्छ करून काही वेळ उन्हात ठेवावे. उन्हात ठेवल्याने मक्याचे दाणे बारीक करणे सोपे होते. दिवसभर उन्हात ठेवल्यानंतर हे सुकलेले कडक मक्याचे दाणे मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. मक्याचे दाणे एकाच वेळी बारीक झाले नसतील तर मिक्सरमध्ये टाकून पुन्हा बारीक करू शकता.बारीक पावडर केल्यानंतर ती बारीक चाळणीतून चालून घ्या. तुमचे कॉर्न फ्लोर तयार आहे. हे कॉर्न फ्लोर एअरटाइट डब्यात ठेवले तर जास्त दिवस टिकते.

कॉर्न स्टार्च आणि कॉर्न फ्लोरमधील फरक

कॉर्नस्टार्च आणि कॉर्न फ्लोरमधील हे दोन्ही कॉर्नपासून बनवलेले असले तरी या दोन्हीचे स्वरूप, टेक्स्चर आणि उपयोग भिन्न आहेत. कॉर्नस्टार्च ही एक पांढरी पावडर आहे जी सॉस, ग्रेव्ही, स्ट्यू, सूप पदार्थ असे घट्ट करण्यासाठी वापरली जाते. कॉर्न फ्लोर हे संपूर्ण दाण्यापासून बनवले जाते तर कॉर्नस्टार्च मक्याच्या दाण्याच्या एंडोस्पर्मपासून बनवले जाते. एंडोस्पर्ममधील स्टार्च काढून, ते धुवून, वाळवले जातात आणि त्यांची बारीक पावडर बनवली जाते. कर्नलचे इतर भाग वेगळे केले जातात आणि त्यावर प्रक्रिया करून त्यापासून कॉर्न ऑइल आणि कॉर्न ब्रानसारखे इतर पदार्थ बनवले जातात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raksha Bandhan PM Modi : राख्यांनी सजलेले मनगट, मुलांसोबत आनंद… पंतप्रधान मोदींचे खास रक्षाबंधन

Trump and Putin meeting : युक्रेनचे युद्ध संपणार? दोन्ही देशाचे राष्ट्राध्यक्ष भेटण्याच्या तयारीत

Sayaji Shinde : सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे पुन्हा रंगभूमीवर, दिसणार 'या' नाटकामध्ये

Rainforest Challenge India : गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेत सिरीलने '४बाय ४ मॉडिफाइल्ड' विभागात पटकावला दुसरा क्रमांक