Team Lokshahi
Team Lokshahi
लाईफ स्टाइल

Weight Gain: खजूर खाल्ल्याने वजन वाढेल झपाट्याने, दिवसभरात एवढे करा सेवन ठरेल फायदेशीर

Published by : shweta walge

खजूर खायला चविष्ट असतात त्यापेक्षा जास्त पोषक असतात. जे लोक खजूराचे सेवन करतात, त्यांच्या आरोग्याला यापासून अनेक फायदे मिळतात. खजूरमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, हेल्दी फॅट, फोलेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक चांगल्या प्रमाणात असतात. ज्यांच्यामध्ये तांबे, जस्त, लोह आणि फॉस्फरसची कमतरता आहे, त्यांच्यासाठीही खजूराचे सेवन फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, वजन वाढवण्यासाठी खजूर खाणे खूप फायदेशीर आहे.आज आम्ही तुम्हाला वजन वाढवण्यासाठी खजूर खाण्याची योग्य वेळ कोणती आणि किती प्रमाणात खाऊ शकता ते सांगणार आहोत.

वजन वाढवण्यासाठी यावेळी खजूर खा

वजन वाढवण्यासाठी खजूर हा खूप चांगला आहार आहे. वर्कआउट करण्यापूर्वी 30-60 मिनिटा अगोदर खजूर खा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही रात्रीही ते खाल्ल्यानंतर झोपू शकता. ज्या लोकांना त्यांचे वजन वाढवायचे आहे त्यांनी सकाळी खजूर खाऊ नये कारण त्यात भरपूर फायबर असते ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही. पण जर तुम्ही फक्त हेल्दी राहण्यासाठी याचे सेवन करत असाल तर तुम्ही सकाळी खजूर खावे. ज्या लोकांना अशक्तपणा वाटतो ते नाश्त्यात खजूर खाऊ शकतात.

एका दिवसात इतक्या खजूर खाणे योग्य आहे का?

ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी दिवसातून ७ ते ८ खावे. एका खजूरत सुमारे 20 कॅलरीज असतात, त्यामुळे तुम्हाला सुमारे 240 कॅलरीज मिळतील. ज्यांना पोटाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी खजुराचे सेवन खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारते.

अशा प्रकारे खजूर खा

वजन वाढवण्यासाठी रात्री खजूर खा. याशिवाय तुम्हाला हवं असेल तर दुधासोबतही खाऊ शकता. दूध आणि खजूर एकत्र खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढण्यास मदत होते. यासाठी दुधात खजूर टाकून उकळा आणि नंतर सेवन करा.

Labour Day Wishes: ज्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि समर्पणामुळे देश घडला अशा सर्व कामगारांना, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi Rajbhasha Day: मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन जागवा मराठीचा अभिमान!

Maharashtra Day 2024 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

टी-२० वर्ल्डकपसाठी भारताच्या मुख्य संघात रिंकू सिंगला डावललं, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आवळला नाराजीचा सूर

"काँग्रेसला सत्तेत आणू नका, नाहीतर तुमच्या संपत्तीवर..." PM नरेंद्र मोदींचा जनतेला इशारा