15 ऑगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र मिळाले होते. मात्र महाराष्ट्राला स्वातंत्र्य नव्हते. कारण भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा आपला नकाशा पुर्णपणे वेगळा होता. त्यानंतर हळूहळू राज्य भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर तो वेगळा झाला. त्यानंतर 1 मे हा दिवस राज्यभर महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राज्यामधील शाळा, विद्यापीठे आणि सरकारी कार्यालयांना या राज्य सरकारकडून सुट्टी दिली जाते.1मे याच दिवशी कामगार दिवस (International Workers' Day) साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 106 जणांनी आपले बलिदान दिले होते. या हुतात्म्यांचे स्मरण 1 मे रोजी केले जाते.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रांतीय राज्य मुंबईमध्ये (Mumbai) विलीन करण्यात आले होते. मुंबईमध्ये प्रांतातील गुजराती (Gujarati) आणि मराठी बोलणारे लोक राहत असत. त्याचवेळी या भाषेच्या आधारे राज्य निर्माण करण्याची मागणीसाठी जोर धरला होता. मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांना त्याचे राज्य वेगळे हवे होते तर गुजराती भाषा बोलणाऱ्या लोकांना त्याचे राज्य वेगळे हवे होते. अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. यावेळी देशात अनेक आंदोलने केली. आणि याचा परिणाम म्हणून १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली. म्हणजेच महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य हे पूर्वी एक राज्य म्हणून ओळखले जात असे.
अनेक राज्य “राज्य पुनर्रचना कायदा” १९५६ अंतर्गत निर्माण झाली. या कायद्याच्या आधारे कन्नड (Kannada) भाषा बोलणाऱ्या लोकांना म्हैसूर राज्य म्हणजेच कर्नाटक (Karnataka) राज्य देण्यात आले होते. तेलुगू (Telugu) भाषेतील लोकांना आंध्र प्रदेश राज्य मिळाले. त्याचप्रमाणे मल्याळम भाषेच्या लोकांना केरळ आणि तमिळ भाषेच्या लोकांना तामिळनाडू राज्य मिळाले. पण मात्र मराठी आणि गुजराती लोकांना स्वतःचे वेगळे राज्य मिळाले नाही. त्यामुळे या लोकांनी स्वत:साठी स्वतंत्र राज्याची मागणी करत अनेक आंदोलनं करायला सुरूवात केली होती.
एका बाजूला १९६० मध्ये गुजरात राज्य निर्माण करण्यासाठी महागुजरात चळवळ सुरू केली. त्याचवेळी महाराष्ट्र राज्याच्या मागणीसह संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली. तसेच १ मे १९६० रोजी भारताच्या विद्यमान सरकारने बॉम्बे राज्याचे दोन राज्यांमध्ये विभाजन करण्यात आले. त्यानंतर मराठी भाषिक लोकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि गुजराती भाषिक लोकांसाठी गुजरात राज्याची निर्मिती केली गेली.