राजकारण

वसंत मोरेंचा सुप्रिया सुळेंच्या गाडीतून प्रवास; चर्चांना उधाण

वसंत मोरेंनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत एकत्र पाहणी केल्याने चर्चांना उधाण

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक वसंत मोरे यांची राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून वसंत मोरे यांनी प्रवास केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले असून वसंत मोरेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना बळ मिळाले आहे.

पुण्यातील पक्षातंर्गत वादामुळे वसंत मोरे नाराज असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी राज ठाकरे व अमित ठाकरेंनीही भेट घेतली होती. वसंत मोरेंची नाराजी संपली अशी चर्चा असतानाच त्यांनी आज सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून प्रवास केला आहे. सुप्रिया सुळे आणि वसंत मोरे यांनी कात्रज येथील होत असलेल्या उड्डाण पुलाची एकत्रित पाहणी केली. यामुळे वसंत मोरे मनसेची साथ देत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

दरम्यान, याआधीही अजित पवार यांनी वसंत मोरेंना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची खुली ऑफर दिली होती. वसंत मोरे यांनी एका विवाह सोहळ्यात हजेरी लावली होती. त्यावेळी अजित पवार आणि वसंत मोरे यांची भेट झाली होती. या भेटीवेळी अजित पवार यांनी तात्या कधी येता... वाट पाहतोय, असे म्हणत मोरेंना खुली ऑफर दिली होती. यावर वसंत मोरे यांनी ऑफर येतात. पण, मला जायचे असते तर गेलो असतो. इतर पक्ष घेण्यास इच्छुक असतील तर माझा दोष नाही, असे म्हंटले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा