Dinvishesh
Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : जगातील सर्वात मोठा शेअर बाजार सुरु

Published by : Team Lokshahi

जगातील सर्वात मोठा शेअर बाजार असलेल्या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची सुरुवात झाली.

सुविचार

जबाबदारी घेणं म्हणजेच;क्षणाक्षणाला दुसऱ्यांना सांभाळत पुढं जात राहणं !

आज काय घडले

  • १७९२ मध्ये उलाढालीच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा शेअर बाजार असलेल्या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची सुरुवात झाली.

  • १९८७ मध्ये इराकच्या लढाऊ विमानांनी अमेरिकेच्या युएसएस स्टार्क या जहाजावर हल्ला केला. त्यात अमेरिकेचे ३७ सैनिक ठार झाले.

आज यांचा जन्म

  • देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांचा १७४९ मध्ये जन्म झाला. त्यांच्यामुळेच लसीकरणाची पद्धत प्रसिद्ध झाली आणि तेव्हापासूनच वेगवेळ्या आजारांपासून वाचण्यासाठी लसीकरणाचा वापर केला जाऊ लागला.

  • मुस्लिम काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहिणारे इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा १८६५ मध्ये जन्म झाला.

  • लेगस्पिनर भागवत चंद्रशेखर यांचा १९४५ मध्ये जन्म झाला. भारताकडून ५८ कसोटी सामन्यात त्यांनी सहभाग घेतला आहे.

  • गझल गायक पंकज उदास यांचा १९५१ मध्ये जन्म झाला. त्यांना पद्मश्री देऊन गौरविण्यात आले आहे.

आज यांची पुण्यतिथी

  • शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचे १९७२ मध्ये निधन झाले. त्यांना १९६१ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

  • कसोटी क्रिकेटपटू रुसी शेरियर मोदी यांचे १९९६ मध्ये निधन झाले.

  • वकील आणि समाजसेविका कमिला तय्यबजी यांचे २००४ मध्ये निधन झाले. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर बिहारमध्ये काम केले होते.

  • द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे संस्थांपक सी. पी. कृष्णन नायर यांचे २०१४ मध्ये निधन झाले.

शिवसेनेकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा

विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस पक्ष कारवाई करण्याची शक्यता

Abdul Sattar : विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे, ते राजकीय द्वेषापोटी बोलतात

शिवानी वडेट्टीवार यांना कारणे दाखवा नोटीस